Jio Prime Membership आता पूर्णतः मोफत, कंपनीने घेतला 'हा' मोठा निर्णय; जाणून घ्या सविस्तर
Reliance Jio (Photo Credit: LinkedIn)

सध्या भारतात टेलीकॉम क्षेत्रात क्रांती घडवणारी कंपनी म्हणून जिओ (Jio) कडे पाहिले जाते. 4G नेटवर्क अतिशय स्वत दरात उपलब्ध करून देऊन जिओने अगदी खेड्यापाड्यातही मोबाईलचा वापर पोहचवला. त्यानंतर ग्राहकउपयोगी विविध ऑफर्समुळे जिओचे स्थान बळकट झाले. आता जिओच्या प्राइम मेंबरशिप (Prime Membership) ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. जिओने ग्राहकांची प्राइम मेंबरशिप एका वर्षाने वाढवली आहे, यासाठी कोणतेही शुल्क आकारले गेले नाही. म्हणजेच जिओकडून फ्रीमध्ये एका वर्षाची मेंबरशिप देण्यात आली आहे.

जिओने फेब्रुवारी 2017 मध्ये प्राइम मेंबरशिपसाठी ग्राहकांना 99 रुपयांचे शुल्क आकारण्यात येणार असल्याचे सांगितले होते. मात्र आता कंपनीकडून ही मेंबरशिप एका वर्षासाठी मोफत देण्यात आली आहे. ज्यांच्याकडे आधीपासूनच जिओची मेंबरशिप आहे, अशाच ग्राहकांना या गोष्टीचा लाभ मिळणार आहे. यासाठी तुम्हाला माय जिओ अॅपवर, डाव्या बाजूस हॅम्बर्गर मेन्यूमध्ये, माय प्लान सेक्शनमध्ये तुमची मेंबरशिप रिन्यू झाली आहे का नाही हे तपासता येईल.

जिओ प्राइम मेंबरशिपमध्ये युजर्सना, 399 रुपये, 70 दिवसांमध्ये अनेक लाभ मिळत आहेत. यामध्ये फ्री व्हॉइस (लोकल, एसटीडी, भारतातील कुठल्याही ठिकाणी रोमिंग), एसएमएस आणि 4 जी डेटा अशा गोष्टींचा समावेश आहे. यासाठी वर्षाला 99 रुपये भरणे गरजेचे होते, मात्र आता जिओ ही सुविधा मोफत पुरवत आहे. यामध्ये तुम्ही जिओ टीव्ही, जिओ म्युझिक, जिओ सिनेमा अशा गोष्टींचाही आनंद घेऊ शकता.