शाओमी (Xiaomi) च्या रेडमी (Redmi) चा नवा स्मार्टफोन भारतात आज लॉन्च होणार आहे. रेडमी नोट 10एस (Redmi Note 10S) असे या स्मार्टफोनचे नाव असून ट्विटर आणि इतर सोशल मीडिया माध्यमातून याचे फिचर्स, स्पेसिफिकेशन्स कंपनीद्वारे शेअर केले जात आहेत. रेडमी नोट 10 सिरीजमधील हे लेटेस्ट एडिशन आहे. रेडमी इंडियाच्या अधिकृत युट्युब आणि इतर सोशल मीडिया माध्यमातून हा स्मार्टफोन दुपारी 12 वाजता लॉन्च केला जाईल. लॉन्च झाल्यानंतर हा स्मार्टफोन mi.com आणि Amazon.in खरेदीसाठी उपलब्ध असेल.
रेडमी नोट 10एस मध्ये 6.43 इंचाचा फुल एचडी+AMOLED punch-hole डिस्प्ले देण्यात आला आहे. हा स्मार्टफोनमध्ये MediaTek Helio G95 SoC प्रोसेसर आहे. यात 8 जीबी रॅम आणि 12 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आला आहे.
या स्मार्टफोनमध्ये क्वॉड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला असून 48 MP मेन कॅमेरा Sony IMX582 सेन्सरसह देण्यात आला आहे. यात 8MP चा अल्ट्रा व्हाईड एंगल स्नॅपर, 2MP चा डेप्थ आणि 2MP चा मायक्रो स्नॅपर देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी यात 13MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
Android 11 वर आधारित MIUI 12 या ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. यात 5,000mAh ची बॅटरी 33W च्या फास्ट चार्गिंग सपोर्टसह देण्यात आली आहे. यात कनेक्टीव्हीसाठी dual-band Wi-Fi, Bluetooth 5, GPS, a USB Type-C port आणि फिंगरप्रींट सेन्सर असे फिचर्स देण्यात आले आहेत.
रेडमी नोट 10एस हा स्मार्टफोन 3 वेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. यातील 6GB + 64GB वेरिएंटची किंमत 12,500 रुपये असून 6GB + 128GB वेरिएंटची किंमत 14,500 रुपये आहे. तर 8GB + 128GB वेरिएंटची किंमत 15,999 रुपये इतकी आहे.