प्रतिकात्मक फोटो (Photo Credit: GSMarena.com)

दिग्गज टेक कंपनी शाओमीने (Xiaomi) आपला बजेट स्मार्टफोन Redmi 8 साठी ग्लोबल स्तरावर लेटेस्ट MIUI 12 अपडेट देण्यास सुरुवात केली आहे. या नव्या अपडेटमध्ये डार्क मोड सारखे फिचर्स दिले आहेत. या व्यतिरिक्त युजर्सला अपडेटमध्ये नवा कंट्रोल सेंटर मिळणार आहे. या नव्या अपडेटचा वर्जन क्रमांक V12.0.1.0.QCNMIXM असून त्याची साइज 649MB आहे. युजर्सला या अपडेट मध्ये नवा कंट्रोल सेंटर मिळणार आहे. फोनच्या होम स्क्रिनमध्ये काही बदलाव करण्यासह बग ही फिक्स करण्यात आला आहे. ऐवढेच नाही तर स्टेटर बार ही अपग्रेड केले आहे.

जर तुमच्याकडे रेडमी 8 स्मार्टफोन असून तुम्हाला सॉफ्टवेअर अपडेट करायचे असल्यास सर्वात प्रथम फोनच्या सेटिंग मध्ये जा. तेथे तुम्हाला सॉफ्टवेअर अपडेट ऑप्शन दाखवला जाईल. यावर क्लिक करा. असे केल्यानंतर लेटेस्ट अपडेट डाऊनलोड करा.(Mivi Roam 2 ब्लूटूथ स्पिकर भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमतीसह स्पेसिफिकेशन)

रेडमी 8 स्मार्टफोनमध्ये 6.2 इंचाचा एचडी प्लस डॉट नॉच दिला आहे यामध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 439 प्रोसेसर दिला आहे. तर फोन दोन वेरियंटमध्ये लॉन्चिंग करण्यात आला आहे. याच्या पहिल्या वेरिटंमध्ये 3GB रॅम आणि 32 GB स्टोरेज लैस आहे. तर दुसरा 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज लैस आहे. याचा इंटरनल स्टोरेज 512GB पर्यंत मायक्रोएसडीच्या मदतीने वाढवता येणार आहे. फोन P2i स्पलैश रेस्सिटेंट आहे. या व्यतिरिक्त गोरिल्ला ग्लास प्रोटेक्शन ही दिले आहे.(Amazon Fab Phones Fest Sale 2020 सेलला 22 डिसेंबर पासून सुरुवात; Smartphones आणि Accessories वर 40% सूट)

फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा दिला आहे. याचा प्रायमरी सेंसर 12 मेगापिक्सल आणि दुसरा 2 मेगापिक्सल आहे. सेल्फी कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाल्यास फोनमध्ये 8 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा दिला आहे. सिक्युरिटीसाठी फोनमध्ये फिंगरप्रिंट सेंसर दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी 5000 एमएएच ची बॅटरी ही दिली आहे. जी 18W फास्ट चार्जिंग सपोर्ट करणारी आहे.