Realme X7 5G स्मार्टफोनचा ऑनलाईन सेल आज दुपारी 12 पासून Flipkart आणि Realme.com सुरु; जाणून घ्या ऑफर्स
Realme X7 5G (Photo Credits: Realme India)

Realme X7 5G स्मार्टफोनचा आजपासून सेल सुरु होत आहे. गेल्या आठवड्यात रियलमीने Realme X7 सिरीज भारतात लॉन्च केली. त्यानंतर आज दुपारी 12 पासून फ्लिपकार्ट (Flipkart) आणि रियलमी.कॉम (Realme.com) वर या सेलला सुरुवात होईल. फ्लिपकार्टच्या वेबसाईटवर हा स्मार्टफोन 'Coming Soon'  या टॅगसह दिसेल. आयसीआयसीआय बँक क्रेडिट कार्ड (ICICI Bank Credit Card) वापरल्यास 2000 रुपयांपर्यंतचा डिस्काऊंट अॅक्सिस बँक क्रेडिट कार्डवर (Axis Bank Credit Card) 10 टक्के डिस्काऊंट, फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक क्रेडिट कार्डवर (Flipkart Axis Bank Credit Card) 5 टक्के डिस्काऊंट आणि ईएमआय ऑप्शन्स सारख्या आकर्षक ऑफर्स देखील मिळतील.

Realme X7 5G मध्ये 6.4 इंचाचा सुपर AMOLED फुलस्क्रिन डिस्प्ले 2400x1080  पिक्सल रिजोल्यूशनसह देण्यात आला आहे. यात MediaTek Dimensity 800U प्रोसेसर Mali-G57 GPU सोबत देण्यात आला आहे.

यात ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला असून 64MP चा मेन शूटर, 8MP चा अल्ट्रा वाईल्ड एंगल लेन्स आणि 2MP चा मॉक्रो लेन्स कॅमेरा आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 16MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

Realme X7 5G (Photo Credits: Realme India)
Realme X7 5G (Photo Credits: Realme India)

या स्मार्टफोनमध्ये  4,310mAh ची बॅटरी 50W SuperDart चार्जिंग सपोर्टसह देण्यात आली आहे. अॅनरॉईड 10 वर आधारीत हा स्मार्टफोन Realme UI या ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. या स्मार्टफोन दोन वेरिएंटमध्ये उपलब्ध आहे- 6GB रॅम + 128GB आणि 8GB रॅम + 128GB इंटरनल स्टोरेज. कनेक्टीव्हीसाठी यात USB Type-C port, 802.11 a/b/g/n/ac, GPS / GLONASS, अल्ट्रा-फास्ट डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आणि इतर फिचर्स देण्यात आले आहेत. Realme X7 5G चा 6GB + 128GB वेरिएंट 19,999 रुपयांना तर 8GB + 128GB चा वेरिएंट 21,999 रुपयांना उपलब्ध असेल.