Realme Narzo 20A First Sale आज दुपारी 12 पासून Flipkart & Realme.com वर सुरु; पहा, काय आहेत ऑफर्स
Realme Narzo 20A (Photo Credits: Realme India)

चायनीज स्मार्टफोन कंपनी रियलमी च्या रियलमी नार्झो 20 (Narzo 20) सिरीज गेल्या आठवड्यात भारतात लॉन्च झाली. या सिरीजमध्ये नार्झो 20 (Narzo 20), नार्झो 20ए (Narzo 20A) आणि नार्झो 20 प्रो (Narzo 20 Pro) या स्मार्टफोनचा समावेश आहे, आज (30 सप्टेंबर) नार्झो 20 ए (Narzo 20A) स्मार्टफोनचा पहिला सेल आहे. दुपारी 12 पासून या स्मार्टफोनचा सेल फ्लिपकार्ट (Flipkart) आणि रियलमी.कॉम (Realme.com) वर सादर होणार आहे. या सेलअंतर्गत स्मार्टफोनवर 2500 रुपयांचा डिस्काऊंट मिळत आहे. तसंच आयसीआयसीआय बँक क्रेडिट कार्डवर (ICICI Bank Credit Cards) 5% इंस्टंट डिस्काऊंट आणि फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक क्रेडिट कार्डवर (Flipkart Axis Bank Credit Cards)  5% अनलिमिडेट कॅशबॅक दिला जात आहे. त्याचबरोबर नो-कॉस्ट ईएमआय (No-cost EMI) आणि स्टॅंडर्ड ईएमआयचा (Standard EMI) पर्याय देखील खुला आहे.

नार्झो 20 ए स्मार्टफोनमध्ये 6.5 इंचाचा एचडी+ डिस्प्ले 20:9 आस्पेक्ट रेशोसह देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. यात 12MP ची मेन लेन्स, 2MP चा मोनोक्रोम सेन्सर आणि 2MP चा रेट्रो कॅमेरा देण्यात आला आहे. तसंच सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 8MP चा फ्रंट कॅमेरा दिला आहे. क्वालकॉम स्नॅपड्रगन 665 चिपसेट चा प्रोसेसर असून या स्मार्टफोनमध्ये 4GB रॅम 64GB इंटरनल स्टोरेजसह देण्यात आला आहे.

पहा व्हिडिओ:

या स्मार्टफोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी रिव्हर्स चार्जिंग सपोर्टसह देण्यात आली आहे. तसंच हा स्मार्टफोन दोन वेरिएंटमध्ये उपलब्ध आहे- 3GB रॅम+32GB स्टोरेज आणि 4GB रॅम+64GB स्टोरेजसह देण्यात आला आहे.

Realme Narzo 20A (Photo Credits: Realme India)
Realme Narzo 20A (Photo Credits: Realme India)
Realme Narzo 20A (Photo Credits: Realme India)

कनेक्टीव्हीसाठी या स्मार्टफोनमध्ये 4G VoLTE, Wi-Fi, Bluetooth 5.0, GPS/A-GPS, a rear-mounted फिंगरप्रींट सेन्सर आणि मायक्रो युएसबी पोर्ट देण्यात आला आहे. रियलमी नार्झो 20ए हा स्मार्टफोनचे 3GB+32GB वेरिएंट 8499 रुपये तर 4GB+64GB वेरिएंट 9499 रुपयांना उपलब्ध आहे.