Realme Narzo 10A स्मार्टफोनचा उद्या फ्लिपकार्टवर होणार फ्लॅशसेल; 4 कॅमेरे असलेल्या या स्मार्टफोनची किंमत ऐकून तुम्हाला बसेल सुखद धक्का!
Realme Narzo 10A (Photo Credits: Twitter)

स्मार्टफोन निर्माता कंपनी Realme चा नवा स्मार्टफोन Realme Narzo 10A चा उद्या म्हणजेच 14 ऑगस्टला दुपारी 12 वाजता ऑनलाईन शॉपिंग साइट फ्लिपकार्टवर (Flipkart) फ्लॅशसेल होणार आहे. या फ्लॅशसेलमध्ये Axis Bank Credit कार्ड धारकांना 5% कॅशबॅक मिळणार आहे. तसेच Realme च्या अधिकृत वेबसाइटवरुन याची खरेदी केल्यास MobiKwik द्वारा पेमेंटवर 500 रुपयांची सुपरकॅश मिळत आहे. त्याचबरोबर फोनला 1000 रुपयांच्या नो कॉस्ट EMI वर खरेदी केले जाऊ शकते.

Realme Narzo 10A स्मार्टफोनची सर्वात सुखद गोष्ट म्हणजे 4 कॅमेरा असलेल्या या स्मार्टफोनची किंमत केवळ 8999 रुपये इतकी आहे. या स्मार्टफोनच्या डिस्प्ले विषयी बोलायचे झाले तर, यात 6.5 इंचाची डिस्प्ले देण्यात आली आहे, जी नॉच सह येते. त्याचबरोबर यात ट्रिपल स्लॉट दिला गेला आहे ज्याच्या मदतीने दोन सिम आणि एक मायक्रो एसडी कार्ड वापरू शकतो. हा स्मार्टफोन रियर फिंगरप्रिंट सेंसरसह येतो. Realme Narzo 10 स्मार्टफोन मीडिया टेक चे Helio G80 चिपसेट दिले गेले आहे. Realme C12 आणि Realme C15 स्मार्टफोन येत्या 18 ऑगस्टला होणार लॉन्च, जाणून घ्या फिचर्स

या स्मार्टफोनमध्ये 3GB RAM + 32GB स्टोरेज वेरिएंट 8,999 रुपयात उपलब्ध आहे. तर 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज वेरिएंट ची किंमत 9,999 रुपये आहे.

या स्मार्टफोनच्या कॅमे-याविषयी बोलायचे झाले तर, यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. या फोनमध्ये प्रायमरी कॅमेरा सेंसर 12MP सह कंपनीने दिला असून 2MP मॅक्रो आणि 2MP प्रोर्टेड सेंसर दिला आहे. या फोनमध्ये 5MP फ्रंट कॅमेराही दिला आहे.