Realme Narzo 10A चा आज दुपारी 2 वाजता Flipkart वर होणार फ्लॅशसेल, खरेदी करण्यापूर्वी माहित करुन घ्या 'या' गोष्टी
Realme Narzo 10A (Photo Credits: Twitter)

स्मार्टफोन निर्माता कंपनी रियलमीचा नवा स्मार्टफोन Realme Narzo 10A चा आज दुपारी 2 वाजता ऑनलाईन शॉपिंग साइट फ्लिपकार्टवर फ्लॅशसेल होणार आहे. या सेलमध्ये अॅक्सिस बँक क्रेडिट कार्ड (Axis Bank Credit Card) आणि अॅक्सिस बँक बझ क्रेडिट कार्ड (Axis Bank Buzz Credit Card) याच्यावर 5% डिस्काऊंट देण्यात येणार आहे. तसंच हा मोबाईल खरेदी करताना युजर्स नो कॉस्ट ईएमआय आणि सँडर्ड ईएमआयचा पर्याय देखील निवडू शकतात. ज्यात तुम्हाला 1000 रुपयांचा EMI भरावा लागणार आहे. त्याचबरोबर हा स्मार्टफोन रियलमी ची अधिकृत साइट Realme.com देखील खरेदी करु शकता.

Realme Narzo 10A मध्ये 6.5 इंचाचा मीनी ड्रॉप फुल एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे. याचे रिजोलूशन 1600x720 पिक्सल इतके आहे. यात ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 12MP चा मेन कॅमेरा, 2MP पोट्रेट लेन्स आणि 2MP मॉक्रो लेन्स देण्यात आली आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी या मोबाईलमध्ये 5MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे., तसंच या स्मार्टफोनमध्ये MediaTek Helio G70 SoC प्रोसेसर असून 5,000mAh बॅटरी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे याला 10W चा चार्जिंग सपोर्ट आहे. How to Download Hotstar: हॉटस्टार अ‍ॅप कसे डाउनलोड करावे? पाहा 'या' सोप्प्या Steps आणि लुटा आयपीएलचा आनंद

Realme Narzo 10A Specifications:

प्रोसेसर MediaTek Helio G70
रॅम 3GB
इंटरनल स्टोरेज (मेमरी) 32GB
बॅटरी 5000mAh
बॅक कॅमेरा 12MP, 2MP, 2MP
सेल्फी कॅमेरा 5MP
फास्ट चार्जिंग सपोर्ट 10W पॉवर चार्गिंग

हा मोबाईल अॅनरॉईड 10 वर आधारित रियलमी UI ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. Realme Narzo 10A हा मोबाईल 'सो ब्लू' आणि 'सो व्हाईट' या दोन शेड्समध्ये उपलब्ध आहे. या मोबाईलमध्ये 3GB रॅम दिला असून 32GB इंटरनल स्टोरेज दिलेला आहे. या मोबाईलमध्ये फिंगर प्रिंट सेन्सर दिला असून मोबाईल फक्त 0.27 सेकंदात अनलॉक होतो. Realme Narzo 10A च्या 3GB & 32GB च्या वेरिएंटची किंमत 8,999 रुपये इतकी आहे.