Realme कंपनीने काही दिवसांपूर्वी भारतात लाँच केलेल्या Realme Buds Classic Earphones ची विक्री आजपासून सुरु केली आहे. साउंड आणि लूक्समध्ये आकर्षक असणा-या या ईअरफोन्सला तुम्ही ऑनलाईन शॉपिंग साइट Amazon.in वर खरेदी करु शकता. आज दुपारी 12 वाजल्यापासून हे डिवाईस अॅमेजॉनवर विक्रीसाठी उपलब्ध झाले आहे. या ईअरफोन्सची किंमत 399 रुपये इतकी असेल. भारतीय बाजारात या ईअरफोन्सची Mi च्या ईअरबड्ससह होईल. Realme Buds Classic भारतात निळ्या आणि काळ्या अशा दोन रंगात उपलब्ध केले आहेत.
आज दुपारी (24 ऑगस्ट) दुपारी 12 वाजल्यापासून अॅमेजॉनवर याची व्रिकी सुरु झाली आहे. याच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, यात 14.2mm ऑडियो ड्रायवर दिला गेला आहे. त्याचबरोबर यात बिल्ट इन हाय डेफिनेशन मायक्रोफोन दिला गेला आहे. ज्याचा वापर कॉल दरम्यान केला गोला आहे. त्याशिवाय यात एक कंट्रोल बटन दिला गेला आहे. जो आवाज कमी किंवा जास्त करण्यासाठी वापरु शकतो. त्याचबरोबर कॉल उचलण्यासाठी आणि डिस्कनेक्ट करण्यासाठी वापरतो.
हेदेखील वाचा- Realme C12 आणि Realme C15 स्मार्टफोन येत्या 18 ऑगस्टला होणार लॉन्च, जाणून घ्या फिचर्स
याच्या वायरविषयी बोलायचे झाले तर, यात TPU कव्हरिंग देण्यात आली आहे. जी अगदी सहजपणे फोल्ड आणि अनफोल्ड करु शकतो. यात 3.5mm कनेक्टर दिला गेला आहे. ज्याला तुम्ही तुमच्या स्मार्टफोन, लॅपटॉप, टॅबलेट शी कनेक्ट करु शकता.
Realme Buds Classic ईअरफोन्सच्या असलेल्या गोल आकारामुळे कानांना चांगला अनुभव मिळतो. याच्या किंमतीच्या तुलनेत यात खूप चांगली वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.