Realme च्या नावाने चालवली जातेय Fake Website, कंपनीने ग्राहकांना केले अलर्ट
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-Twitter)

चीन मोबाईल निर्माती कंपनी रियलमी (Realme) कंपनीने त्यांच्या बेबसाईटबाबत युजर्सला अलर्ट केले आहे. त्यानुसार कंपनीने असे म्हटले आहे की, रियलमी कंपनीच्या नावाने एक खोटी बेवसाईट चालवली जात आहे. तसेच लोकांना कंपनीच्या शाखा सुरु करण्याबबात पार्टनरशिप करण्याबाबत विचारणा करतात. www.realmepartner.in या खोट्या नावाने बेवसाईट सुरु करुन नागरिकांना फसवत आहेत. त्यामुळे नागरिकांनी यापासून सावध रहावे अशी सुचना कंपनीने दिली आहे. कंपनीच्या सीईओ यांनी असे म्हटले आहे की, आम्हाला नागरिकांची अशा खोट्या बेबसाईटच्या माध्यमातून फसवणूक असल्याची माहिती धक्कादायक आहे. परंतु आमची एकच अधिकृत वेबसाईट असल्याचे स्पष्ट केले आहे.

रिलयमी बर्ड्स, कनेक्टर्स आणि वायर्स असे कंपनीचे विविध प्रोडक्स विकले जात असल्याची ही बाब समोर आणली आहे. या खोट्या पद्धतीचे प्रोडक्स विकणाऱ्यांच्या विरोधात कडक कारवाई करत आहोत. कंपनीचे ओरिजनल प्रोडक्स फक्त अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. तसेच कंपनी सध्या नामांकित प्लॅटफॉर्वर त्यांच्या प्रोडक्सची विक्री केली जाते.(WhatsApp वर सिक्रेट ग्रुपच्या माध्यमातून लपवता येणार फोटो-व्हिडिओ, जाणून घ्या कसे)

तर नुकताच कंपनीने Realme कंपनीचा पहिला 5G स्मार्टफोन चीनमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. Realme X50 स्मार्टफोनची गेल्या काही काळापासून सर्वजण वाट पाहत होते. कंपनीचा या वर्षातील हा पहिला स्मार्टफोन असून रियअलमी X2 Pro च्या नंतर प्रीमियम सेंगमेंटमधील पहिला स्मार्टफोन आहे.स्मार्टफोनच्या डिस्प्लेबाबत बोलायचे झाल्यास यामध्ये 6.57 इंचाचा Full HD+डिस्प्ले देण्यात आला आहे. रियअलमी एक्स 50 चा प्रायमरी कॅमेरा 64 मेगापिक्सल, 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड अॅंगल लेन्स, 12 मेगापिक्सलचा टेलिफोटो लेन्स आमि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा देण्यात आला आहे. कॅमेऱ्यात 20X झूम आणि 4K व्हिडिओ रेकॉर्डिंगसारखे फिचर्स देण्यात आले आहेत. सेल्फी काढण्यासाठी युजर्सला 8 मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे.