Realme 9i (PC- @gizmochina/twitter)

Realme 9i Launches in India: रियलमीने आपला पुढचा लेव्हल पॉवरफुल स्मार्टफोन Realme 9i लॉन्च केला आहे. हा फोन दोन स्टोरेज पर्यायांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. त्याच्या 4 GB रॅम आणि 64 GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 13,999 रुपये आहे. तर 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंट 15,999 रुपयांना मिळेल. फोन प्रिझम ब्लॅक आणि प्रिझम ब्लू या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये येईल. फोनची विक्री 25 जानेवारी 2022 पासून सुरू होईल. तुम्ही Realme वेबसाइटसह Flipkart आणि Rear Store वरून फोन खरेदी करू शकता. याशिवाय तुम्ही ICICI बँक कार्डवरून सवलतीत फोन खरेदी करू शकता. हा फोन 6nm आधारित क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 680 चिपसेट सपोर्टसह सादर करण्यात आला आहे. फोनमध्ये 90Hz अल्ट्रा स्मूथ डिस्प्ले आहे. फोनमध्ये 50-मेगापिक्सलचा ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. फोन ड्युअल स्टीरिओ स्पीकरसह येईल. फोन स्टीरिओ प्रिझम डिझाइनमध्ये येईल. फोनमध्ये 11 जीबी डायनॅमिक रॅम सपोर्ट देण्यात आला आहे. फोनमध्ये 5000mAh बॅटरी उपलब्ध आहे, ज्याला 33W डार्ट चार्ज सपोर्ट मिळेल. (वाचा - OnePlus 10 Pro: प्रतीक्षा संपली! बाजारात आला 'वन प्लस 10 प्रो'; जाणून घ्या फीचर्स, कॅमेरा आणि किंमत)

Realme 9i स्पेसिफिकेशन -

Realme 9i स्मार्टफोनमध्ये 6.6 इंचाचा FHD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनला 90Hz रिफ्रेश रेट, 180Hz टच सॅम्पलिंग रेट आणि 90.8% स्क्रीन टू बॉडी रेशो सपोर्ट देण्यात आला आहे. Realme 9i स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनमध्ये प्राथमिक कॅमेरा म्हणून 50MP Samsung S5KJN1SQ03 लेन्स आहे. याशिवाय, फोनमध्ये 2MP डेप्थ सेन्सर, आणखी 2MP लेन्स आहे. फोनला f/2.4 अपर्चर सपोर्ट देण्यात आला आहे.

कनेक्टिव्हिटीसाठी, फोनमध्ये 4G, ड्युअल-बँड वाय-फाय, ब्लूटूथ, GPS आणि USB टाइप-सी पोर्ट आहे. हा फोन स्नॅपड्रॅगन 680 चिपसेट सपोर्ट सह सादर करण्यात आला आहे. जे adreno 610 GPU आणि 6GB LPDDR4x रॅम सपोर्टसह येईल. फोनमध्ये 128GB UFS 2.1 स्टोरेज सपोर्ट देण्यात आला आहे. फोनचा डायमेंशन 164.4X75.7X8.4mm आहे. फोनचे वजन 190 ग्रॅम आहे.

Realme 9i स्मार्टफोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. यात 33W फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. फोन Android 11 आधारित Realme UI 2.0 कस्टम स्किन आउट ऑफ द बॉक्सवर काम करत आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये 16MP Sony IMX471 लेन्स देण्यात आली आहे. फोन साइड माउंटेड फिंगरप्रिंट सपोर्टसह येईल.