लॉकडाऊनमुळे अनेक स्मार्टफोन कंपनीना आर्थिक संकटाचा सामना करावा लागला होता. दरम्यान, स्मार्टफोन कंपनीच्या विक्रीतही मोठी घट झाली आहे. यामुळे अनेक कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आपल्या स्मार्टफोनवर मोठी सूट देत आहेत. यातच रियलमी कंपनीचा स्मार्टफोन रियलमी 6 (Realme 6) च्या खरेदीवर तब्बल 4 हजार 250 रुपयांची सूट देण्यात मिळत आहे. फ्लिपकार्टने रियलमी 6 ला 3 हजारांच्या सूटसोबत लिस्ट केले आहे. एवढेच नव्हेतर, ई-कॉमर्स कंपन्या या स्मार्टफोनच्या खरेदीवर बँक आणि एक्सचेंज बोनस ऑफर देत आहेत.
फ्लिपकार्टवर सुरु असलेल्या फ्लिपकार्ट बीग सेव्हींग डेज सेलमध्ये हा स्मार्टफोन (4 जीबी रॅम/64 जीबी स्टोरेज) 10 हजार 800 रुपयात खरेदी करता येणार आहे. 6 जीबी रॅम असलेल्या स्मार्टफोनची किंमत 11 हजार 749 आहे. तर, 8 जीबी रॅम असलेल्या स्मार्टफोनची किंमत 13 हजार 749 देण्यात आली आहे. या सेलमध्ये 3 हजारांच्या सूट शिवाय ग्राहकांना एसबीआय क्रेडिट कार्डचा वापर केल्यास 10 टक्के जास्तीत जास्त 1 हजार 250 रुपयांची अतिरिक्त सूट मिळू शकणार आहे. हे देखील वाचा- Vodafone Idea चा नवा 'Digital Exclusive' प्रीपेड प्लॅन; केवळ 'या' ग्राहकांनाच मिळणार लाभ
रियलमी 6 हा ड्युअल-सिम फोन आहे, जो अँड्रॉइड 10 वर आधारित रियलमी यूआय वर चालतो. या स्मार्टफोनमध्ये 6.5 इंचाचा फुल-एचडी + (1080x2400 पिक्सेल) अल्ट्रा स्मूद डिस्प्ले देण्यात आला आहे. रियलमी 6 या स्मार्टफोन आहे, ज्यात चार कॅमेऱ्याचा समावेश आहे. रियलमीच्या या फोनमध्ये 16-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. रियलमी 6 मध्ये यूएफएस 2.1 इनबिल्ट स्टोरेज आहे. कनेक्टिव्हिटी वैशिष्ट्यांमध्ये 4 जी व्हीएलटीई, वाय-फाय 802.11 एसी, ब्लूटूथ 5.0, जीपीएस/ ए-जीपीएस आणि यूएसबी टाइप-सी पोर्टचा समावेश आहे. एक्सेलरमीटर, एम्बियंट लाइट सेन्सर, मॅग्नेटोमीटर आणि प्रॉक्सिमिटी सेन्सर हा फोनचा भाग आहेत. स्मार्टफोनची बॅटरी 4,300 एमएएच असून 30 वॅटची फ्लॅश चार्ज टेक्नॉलॉजी सपोर्ट करते.