गुगल मॅप दाखवणार युजर्सला Public Toilet चा मार्ग
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit: New York Post)

गुगल मॅप (Google Map) सध्या त्यांच्या युजर्ससाठी प्रत्येकवेळी नवीन फिचर्स घेऊन येतात. तर काही दिवसांपूर्वीच ट्रेन आणि बसच्या गर्दीची माहिती देण्यात येणार असल्याचे फिचर नुकतेच लॉन्च केले. त्यानंतर आता गुगल मॅपवरुन युजर्सला सार्वजनिक शौचालय कुठे आहेत याचे ठिकाणी आणि मार्ग दाखवणार आहे.

केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून गुगलने 45 हजार सार्वजनिक शौचालय गुगल मॅप्सला जोडली आहेत. तसेच देशातील 1700 शहरांमधील शौचालये यामध्ये जोडली गेली आहेत. तर गुगलच्या या नव्या फिचरला 'पब्लिक टॉयलेट्स नीयर मी' असे नाव देण्यात आले आहे. त्याचसोबत गुगलकडून बाइक-शेअरिंगसाठी उपलब्ध करुन देण्यात आलेल्या स्टेशनांची माहिती देणार आहे.(गुगल मॅपवरुन Mumbai Flood ची माहिती 'या' पद्धतीने मिळवा)

गुगलचे हे नवे फिचर अॅन्ड्रॉईड आणि आयओएस वर युजर्सला सुरु करुन देण्यात आले आहे. बाइक शेअरिंग या फिचरच्या माध्यमातून किती बाइक उपलब्ध आहेत की नाही हे सुद्धा सांगितले जाणार आहे. यासाठी गुगलने आयटीओ वर्ल्डसोबत पार्टनरशिप केली असल्याचे बोलले जात आहे.