खुशखबर! PUBG गेम खेळणे झाले अजून सोपे, मिळणार गिफ्ट्ससुद्धा; भारतामध्ये पब्जीची जिओ सोबत डिजिटल पार्टनरशिप
PUBG (Photo Credit: File Photo)

देशात एक वादग्रस्त मोबाईल गेम म्हणून पब्जीकडे (PUBG) पहिले जाते. या खेळाविरुद्ध न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली होती. मात्र तरी या खेळाची लोकप्रियता कमी झाली नाही. आता आपला भारतातील डिजिटल पार्टनर (Digital Partner) म्हणून पब्जी खेळाने, जिओ (Reliance Jio) ची निवड केली आहे. मागच्या आठवड्यात या खेळाचे बिटा व्हर्जन भारतात प्रसिद्ध करण्यात आले. ही बिटा सर्व्हिस PUBG च्या LITE व्हर्जनसाठी असेल. यासाठी जिओ आणि पब्जी या कंपन्या एकत्र आल्या आहेत.

कमी क्षमतेच्या काँप्युटरवर किंवा जुन्या व्हर्जनच्या सिस्टीमवर आणि इंटरनेटची कमी रेंज असेल तेव्हासुद्धा या गेमचा उत्तम अनुभव मिळावा यासाठी, PUBG चे LITE व्हर्जन मदत करणार आहे. जिओ युजर्स फ्रीमध्ये हा  PUBG LITE गेम खेळू शकणार आहेत. यासाठी युजर्सना जिओकडून बक्षिसेही देण्यात येणार आहेत.

असे मिळवा गिफ्ट्स : 

  • जियो वापरकर्ते https://gamesarena.jio.com ला भेट देऊन नोंदणी फॉर्म भरू शकतात.
  • नंतर वापरकर्त्यांना त्यांच्या ईमेल आयडीवर एक व्हेरिफिकेशन लिंक प्राप्त होईल.
  • व्हेरिफिकेशन पूर्ण झाल्यानंतर, वापरकर्त्यास एक रीडेम्प्शन कोडसह दुसरा मेल प्राप्त होईल, जो गेमदरम्यान आपण क्लेम करू शकता.

रीडेम्प्शन कोडचा कसा उपयोग करावा : 

  • PUBG लाइट डाउनलोड केल्यानंतर आणि नोंदणी केल्यानंतर मेनू स्टोअरमध्ये जा
  • मेनू पर्यायांमध्ये, बोनस/गिफ्ट कोड पर्यायावर क्लिक करा.
  • रिक्त स्थानामध्ये रीडेम्प्शन कोड भरल्यानंतर रीडीम वर क्लिक करा.