Poco X3 आज भारतात होणार लाँच, येथे पाहा लाईव्ह इव्हेंट
Poco X3 (Photo Credits: Twitter)

भारतीय बाजारात (Indian Market) सर्वांना आतुरता लागून राहिलेला Poco X3 स्मार्टफोन काहीच वेळात भारतात लाँच होणार आहे. आज दुपारी 12 वाजता वाजता हा स्मार्टफोन लाँच होईल. या स्मार्टफोनची किंमत आणि याची आकर्षक वैशिष्ट्ये काय असतील याची सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे. त्यामुळे तुम्ही युट्यूब पेजवर (YouTube) याचा लाईव्ह इव्हेंट (Live Event) देखील पाहू शकता. अगदी कमी काळात Poco कंपनीने भारतीय बाजारात चांगला जम बसवला आहे. काही दिवसांपूर्वी कंपनीने ट्विट (Tweet) केलेल्या टिजरमध्ये फोनचा फ्रंट (Front) आणि बॅक पॅनल(Back Panel) दिसत आहे. ज्यात सेल्फी कॅमे-यासाठी होल-पंच डिझाईन आणि मागील बाजूस क्वाड कॅमेरा सेटअप असल्याची माहिती मिळत आहे.

अलीकडेच एका टिप्सटरने असा दावा केला होता Poco X3 ची भारतातील किंमत 19,000 ते 20,000 च्या दरम्यान असू शकते. युरोपमध्ये मागील आठवड्ता Poco X3 NFC लाँच केला होता. त्याच्या 6GB+64GB स्टोरेज आणि 6GB+128GB स्टोरेजची किंमत क्रमश: 229 यूरो (जवळपास 19,900 रुपये) व 269 यूरो (जवळपास 23,400 रुपये इतकी आहे. Poco X3 भारतात 22 सप्टेंबरला होणार लाँच; काय असू शकतात या स्मार्टफोनची खास वैशिष्ट्ये

या स्मार्टफोनचा लाईव्ह इव्हेंट येथे पाहा

अलीकडेच पोकोने आपला Poco M2 स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे. या स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत ( Poco M2 Smartphones Price ) 10,999 रुपयांपासून सुरु होत आहे. ही किंमत 64जीबी स्टोरेज असलेल्या मॉडेलसाठी आहे. इतर मॉडेल 6 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज इतका आहे. ज्याची किंमत 12,499 रुपये आहे.