Poco ने भारतीय बाजारात आपला पहिला स्मार्टफोन Poco X2 लॉन्च केला आहे. शाओमीचा सब ब्रँड असलेला Poco गेल्या महिन्यात शाओमीपासून वेगळे होत आपला स्वतंत्र ब्रँड सुरु केला. त्यानंतर Poco X2 हा नवा स्मार्टफोन लॉन्च करत कंपनीने ई कॉमर्स वेबसाईट Flipkart वर आपला एक्सक्लुसिव्ह फ्लॅश सेल सुरु केला आहे. यापूर्वी तीनदा सेलद्वारे हा स्मार्टफोन ग्राहकांना उपलब्ध करुन देण्यात आला होता. आता चौथ्यांदा हा सेल आयोजित करण्यात आला आहे. यात युजर्संना ऑकर्षक ऑफर्स दिल्या जात आहेत.
Poco X2 चा सेल आज दुपारी 12 वाजल्यापसून Flipkart वर सुरु करण्यात येईल. यात तुम्ही या सेलअंतर्गत हा फोन आकर्षक ऑफर्ससह खरेदी करु शकता. फोनवर नो कॉस्ट ईएमआयची सुविधा देण्यात आली आहे. याशिवाय यात ICICI कार्ड पेमेंटवर 1,000 रुपयांचा इन्टंट डिस्काऊंट देण्यात येईल. तर Axis Bank Buzz क्रेडिट कार्ड असल्यास त्यावर 10% ची सूट मिळेल. (भारतात लवकरच Oppo Reno 3 Pro स्मार्टफोन होणार लॉन्च; 44 मेगापिक्सल सेल्फी कॅमेऱ्यासह अनेक धमाकेदार फिचर्सचा समावेश)
Poco X2 हा फोन तीन स्टोरेज वेरिएंटसह लॉन्च करण्यात आला आहे. यात 6GB + 64GB स्टोरेज मॉडेलची किंमत 15,999 रुपये आहे. तर 8GB + 128GB मॉडेलची किंमत 16,999 रुपये आणि 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 19,999 रुपये आहे. हा स्मार्टफोन रेड, ब्लू आणि पर्पल या तीन रंगात उपलब्ध आहे.
Poco X2 मध्ये 27W चा फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. यात 4500mAh ची बॅटरी देण्यात आली असून हा स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 730G प्रोसेसरवर काम करतो. या फोनमध्ये 6.67 इंचाचा FHD+ incell RD डिस्प्ले देण्यात आला आहे. याचे स्क्रिन रेजोल्यूशन 1080x2400 आहे. Android 10 वर आधारीत Poco X2 मध्ये क्वाड रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 64MP चा मेन सेंसर, 8MP ची व्हाईड अँगल लेन्स, 2MP ची मॅक्रो लेन्स आणि 2MP चा डेप्थ सेंसर आहे. विशेष म्हणजे यात 20MP + 2MP चा ड्युल फ्रंट कॅमेरा आहे.