Surgical Strike Border Escape 3D Game: शत्रूचा बदला घेण्यासाठी उत्तम पर्याय; गूगल प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा हिंदी, इंग्रजी व मराठी मध्ये
सर्जिकल स्ट्राइक: बॉर्डर एस्केप (Photo Credit : Youtube)

29 सप्टेंबर 2016 रोजी, पाकिस्तान-प्रशासित काश्मीरमध्ये नियंत्रण रेषा ओलांडून, अतिरेकी लाँच पॅडच्या विरोधात भारताने 'सर्जिकल स्ट्राइक' (Surgical Strike) केले. सर्व भारतीयांसाठी ही फार अभिमानाची गोष्ट होती. आता भारतीय सैन्यातील या शूर वीरांना श्रद्धांजली म्हणून, प्लॅटनिस्टा गेम्सने (Platanista Games) ‘सर्जिकल स्ट्राइक - बॉर्डर एस्केप’ (Surgical Strike - Border Escape ) हा एक नवा ऑनलाईन मोबाईल गेम सुरू केला आहे. सर्जिकल स्ट्राइक - बॉर्डर एस्केप हा भारताचा पहिला बहुभाषिक (इंग्रजी, हिंदी आणि मराठी) 3 डी शूटिंग गेम आहे. यामध्ये खेळाडू शत्रूच्या प्रदेशातून बाहेर पळताना चिलखत वाहनातून (Armored Fighting Vehicle) बचाव करताना दिसत आहेत.

या खेळाद्वारे भारतीय सैन्याने केल्याला सर्जिकल स्ट्राईकचा भाग बनून पुन्हा एकदा नव्याने सर्वांना परत लढा देण्याची संधी मिळणार आहे. कोणत्या ना कोणत्या कारणाने आपल्या देशासाठी काहीतरी करण्याची इच्छा प्रत्येकाच्याच मनात असते. यामुळेच प्रत्येक देशभक्त भारतीयांच्या भावना लक्षात ठेवून हा खेळ तयार केला गेला आहे. या खेळाचा ट्रेलर हिंदी, मराठी आणि इंग्रजी अशा भाषांमध्ये उपलब्ध आहे. (हेही वाचा: भारतीय वायुसेना लवकरच लाँच करणार मोबाईल गेम, टीजरमध्ये दिसले विंग कमांडर अभिनंदन आणि बालाकोट एअर स्ट्राइकची झलक)

या खेळाचा मराठी ट्रेलर -

गेमच्या मुख्य वैशिष्ट्यांमध्ये वास्तववादी 3 डी ग्राफिक्स, निवडण्यासाठी मोठ्या प्रमाणात गन, शस्त्रे अपग्रेड सिस्टम, अनेक रोमांचक नकाशे, आपल्या पसंतीच्या भाषेत उत्तेजक भाष्य आणि एकाधिक शत्रूच्या प्रकारांचा समावेश आहे. अशा प्रकारे या गेमच्या माध्यमातून तुम्हाला व्हर्च्युअली आपल्या शत्रूशी दाणादाण उडवण्याची संधी मिळत आहे.

प्लेस्टोअरमधून (Google Play store) - https://bit.ly/2ml9M4I  या लिंक वरून तुम्ही हा गेम प्राप्त करू शकता.