खुशखबर! Tata Sky ने बदलला प्लॅन; आता कमी किंमतीमध्ये घ्या जास्त चॅनेल पाहण्याचा आनंद
प्रातिनिधिक प्रतिमा (File Image)

गेल्या काही महिन्यांमध्ये सेट टॉप बॉक्स, डीटीएच (DTH) सेवा, केबल यांचे अनेक नियम बदलले आहेत. डीटीएच सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांमध्ये ग्राहकांना आकर्षित करून घेण्यासाठी स्पर्धा चालू आहेत. अशात टाटा स्कायने (Tata Sky) त्यांच्या एका प्लानमध्ये काही बदल केले आहेत. टाटा स्कायने त्याच्या सर्वात कमी किमतीच्या प्लानमधील चॅनेल आणि कॉम्प्लीमेंट्री सेवांमध्ये काही बदल केले आहेत. 154 रुपयांच्या योजनेत आता कंपनी पूर्वीपेक्षा जास्त चॅनेल देत आहे. पूर्वी या पॅकमध्ये जिथे 150 चॅनेल दिले जात होते, तिथे आता टाटा स्कायने या योजनेत 200 चॅनेल देणार असल्याचे सांगितले गेले आहे.

हे सर्व चॅनेल एसडी रेझोल्यूशन चॅनेल आहेत, ज्यात 29 डीडी चॅनेल आणि 166 एफटीए (FTA ) चॅनेल आहेत. या योजनेत कंपनी 5 सर्व्हिस चॅनेल्सदेखील देत आहे. Tata Sky Darshan मध्ये आपण थेट मंदिरांमधून थेट प्रक्षेपण पाहू शकता. DreamDTH च्या अहवालानुसार, त्यात टाटा स्काय किड्स सिनेमा, टाटा स्काय भोजपुरी सिनेमा, टाटा स्काय शो बिज आणि टाटा स्काय फॅमिली हेल्थ सारख्या सेवा आहेत. (हेही वाचा: खुशखबर! D2H Magic Stick फक्त 399 रु. मध्ये उपलब्ध, तीन महिने मोफत सेवा; Sony LIV, Zee5, ALT Balaji पहा फ्रीमध्ये)

टाटा स्कायने अलीकडेच आपले वॉच पोर्टलही बाजारात आणले आहे. या वॉच पोर्टलवर, वापरकर्ते थेट टीव्ही तसेच टाटा स्कायच्या डीसीएचएच सेवेमध्ये ऑफर केले जाणारे चित्रपट आणि इतर कंटेंट पाहू शकतात. याशिवाय टाटा स्काय ने आणखी एक नवीन सेवा सुरू केली आहे, ज्यामध्ये व्हॉट्सअ‍ॅपच्या अंतर्गत ते वापरकर्त्यांना आपल्या खात्यातील शिल्लक तसेच इन्स्टंट रिचार्ज ऑप्शन, इमर्जन्सी टॉप-अप, चॅनेल पॅक तपशील आणि रीचार्जनंतर खाते रीफ्रेश करण्यास परवानगी यांसारख्या अनेक सुविधा मिळू शकतात.