Google Pay च्या वेब अॅपवर जानेवारी 2021 पासून पेमेंट बंद; त्वरीत पैसे पाठवण्यासाठी आकारले जाऊ शकते शुल्क
Google Pay (Photo Credits: Twitter)

गुगल पे (Google Pay) चे वेब अॅप (Web App) जानेवारीपासून फ्री मनी ट्रान्सफर (Money Transfer) सर्व्हिस बंद करणार आहे. पैशांची त्वरीत देवाण-घेवाण करण्यासाठी आता फी आकारण्यात येणार आहे, अशी माहिती मीडियाने दिली आहे. युजर्संना पैशांची देवाण-घेवाण करण्यासाठी गुगलने गुगल पे मोबाईल अॅप आणि pay.web.com हे वेब अॅप लॉन्च केले होते. परंतु, वेब अॅपवर जारी केलेल्या नोटीसनुसार, पुढच्या वर्षीच्या जानेवारी महिन्यापासून वेब अॅप बंद होणार आहे.

2021 च्या सुरुवातीपासून युजर्स pay.google.com वापरुन पैशांची देवाण-घेवाण करता येणार नाही. त्यामुळे पैशांची ट्रान्सफर करण्यासाठी गुगल पे अॅप वापरण्याचे कंपनीने सांगितले आहे. (Google Map चे नवे अपडेट, ट्रेन-बस आणि सार्वजनिक ठिकाणच्या गर्दीचे मिळणार Live Updates)

यामुळे तुमच्या बँक अकाऊंटमध्ये पैसे ट्रान्सफर करण्यासाठी 1-3 दिवसांचा कालावधी लागेल. डेबिट कार्डने ट्रान्सफर केल्यास त्वरीत पैसे ट्रान्सफर होतील. परंतु, त्यासाठी ट्रान्सफर केलेल्या रक्कमेच्या 1.5% किंवा 23 रुपये यापैकी जी रक्कम जास्त असेल ती शुल्क म्हणून आकारण्यात येईल, असे कंपनीने आपल्या सपोर्ट पेजमध्ये म्हटले आहे.

गुगल पे ने गेल्या आठवठ्यासाठी अॅनरॉईड (Android) आणि आयोएस (iOS) युजर्स नवीन फिचर्स सुरु केले आहेत. सध्या युएसमध्ये लॉन्च केलेल्या नव्या फिचर्सनुसार मोबाईल फर्स्ट बँक अकाऊंट गुगल पे सोबत जोडले जावू शकते.