पॅनासोनिकचे एलुगा Z1 आणि Z1 Pro लॉन्च ; हे आहेत खास फिचर्स
स्मार्टफोन (Photo Credit-PIXABAY)

जपानची इलक्ट्रोनिक्स कंपनी पॅनासोनिकने दोन नवे आर्टिफिशल इंटेलीजेंस असलेले स्मार्टफोन्स लॉन्च केले आहेत. एलुगा Z1 आणि Z1 Pro असे हे दोन नवे स्मार्टफोन्स असून त्यांची किंमत अनुक्रमे 14,490 आणि 17,490 रुपये आहे.

- यापैकी एलुगा Z1मध्ये  3 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज आहे. तर Z1 Pro मध्ये 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज देण्यात आला आहे. कार्डच्या माध्यमातून तुम्ही मेमरी 128 जीबी पर्यंत वाढवू शकता.

- दोन्ही फोन्समध्ये मीडियाटेक हेलियो पी22 प्रोसेसरसोबत ड्युअल सिमची सुविधा देण्यात आली आहे.

- हा फोन अॅनरॉईड 8.1 ओरियो ऑपरेटिंग सिस्टमवर आधारीत आहे.

- या स्मार्टफोनमध्ये 6.19 इंचाचा एचडी प्लस डिस्प्लेसोबत 2.5 कव्र्ड मेटल डिझाईन देण्यात आली आहे. यात 4000 एमएएच ची बॅटरी आहे.

- या फोन्समधये 13 प्लस 2 मेगापिक्सलचा एआय संचालित ड्युअल कॅमेरा आहे. त्याचबरोबर 8 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा प्लशसहित आहे.