Oppo Find X5 सिरिज अधिकृतपणे लाँच करण्यात आली आहे. या मालिकेअंतर्गत, कंपनीने Oppo Find X5, Find X5 Pro आणि Find X5 Lite वरून पडदा उचलला आहे. Oppo Find X5 आणि Find X5 Pro स्मार्टफोन्सबद्दल बोलायचे झाले तर, त्यात एक समर्पित Oppo MariSilicon X चिप वापरण्यात आली आहे, जी इमेज प्रोसेसिंगला चालना देते. हा स्मार्टफोन IP68 प्रमाणित आहे. ज्यामुळे तो पाणी प्रतिरोधक आहे. या स्मार्टफोन्सच्या किंमती आणि वैशिष्ट्यांबद्दल सर्व काही जाणून घेऊयात.
Oppo Find X5, Find X5 Pro, Find X5 Lite: किंमत
Oppo Find X5 एकाच स्टोरेज प्रकारात लाँच करण्यात आला आहे आणि त्याची किंमत EUR 999 म्हणजेच सुमारे 84,500 रुपये आहे. यात 8GB रॅमसह 256GB अंतर्गत स्टोरेज आहे. त्याच वेळी, Oppo Find X5 Pro ची किंमत EUR 1,299 म्हणजेच सुमारे 1,09,900 रुपये आहे आणि ती 12GB + 256GB सिंगल स्टोरेज मॉडेलमध्ये देखील उपलब्ध असेल. हे दोन्ही स्मार्टफोन युरोपमध्ये प्री-बुकिंगसाठी उपलब्ध झाले आहेत. त्यांची विक्री 14 मार्चपासून सुरू होणार आहे. परंतु कंपनीने अद्याप Oppo Find X5 Lite ची किंमत जाहीर केलेली नाही.
Oppo Find X5: स्पेसिफिकेशन्स -
Oppo Find X5 स्मार्टफोनमध्ये ड्युअल सिम सपोर्ट देण्यात आला आहे. हा Android 12 OS वर आधारित आहे. यामध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.55 इंच फुल एचडी + AMOLED डिस्प्ले आहे. त्याची स्क्रीन रिझोल्यूशन 1,080×2,400 पिक्सेल आहे. हा स्मार्टफोन ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 888 प्रोसेसरने सुसज्ज आहे. यात पॉवर बॅकअपसाठी 4,800mAh ड्युअल-सेल बॅटरी आहे.
दरम्यान, फोटोग्राफीसाठी Oppo Find X5 स्मार्टफोनमध्ये तीन रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. त्याचा मुख्य सेन्सर 50MP आहे, तर त्यात 50MP अल्ट्रा वाइड लेन्स आणि 13MP टेलिफोटो लेन्स आहे. त्याचबरोबर सेल्फीसाठी यूजर्सला या स्मार्टफोनमध्ये 32MP फ्रंट कॅमेरा मिळेल.