चायनीज स्मार्टफोन कंपनी ओप्पो (Oppo) चा ओप्पो ए53एस (Oppo A53s 5G) स्मार्टफोन भारतात लॉन्च झाला आहे. 2 मे 2021 रोजी दुपारी 12 वाजल्यापासून या स्मार्टफोनची विक्री फ्लिपकार्टवर (Flipkart) सुरु होईल. या फोनवर आकर्षक ऑफर्स दिल्या जात आहेत. एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्डवरुन (HDFC Bank Credit Card) खरेदी केल्यास 10 टक्क्यांचा इन्स्टंट डिस्काऊंट 1250 रुपयांपर्यंत मिळेल. त्याचबरोबर क्रेडिट ईएमआय (EMI) आणि डेबिट कार्ड नॉन ईएमआय ट्रॅक्नजॅक्शन, फ्लिपकार्ड एक्सिस बँक क्रेडीट कार्डवर (Flipkart Axis Bank Credit Card) 5 टक्क्यांचा अनलिमिटेड कॅशबॅक आणि एचडीएफसी बँक मास्टरकार्ड क्रेडिट कार्डवर (HDFC Bank Mastercard Credit Card) 10 टक्क्यांचा ऑफ देण्यात आला आहे.
Oppo A53s 5G मध्ये 6.52 इंचाचा एचडी+डिस्प्ले 1600x720 पिक्सल आणि 60Hz चा रिफ्रेश रेट देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 700 SoC प्रोसेसर दिला असून 8GB रॅम आणि 12GB इंटरनल स्टोरेज दिला आहे.
या स्मार्टफोनमध्ये 13MP ची मेन लेन्स. 2MP चा डेप्थ सेन्सर आणि 2MP चा मायक्रो स्नॅपर दिला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 8MP चा फ्रंट कॅमेरा दिला आहे. यात 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. कनेक्टीव्हीटीसाठी 4G, वायफाय, जीपीएस, ब्लुट्युथ व्ही5, USB Type-C port, 5G देण्यात आलं असून फिंगरप्रिंट स्नॅनरही देण्यात आला आहे. Oppo A53s 5G स्मार्टफोनच्या 6जीबी + 128 जीबी वेरिएंटची किंमत 14,990 रुपये असून 8GB + 128GB वेरिएंटची किंमत 16,990 रुपये इतकी आहे.