Oppo A33 2020 चा पहिला ऑनलाईन सेल 29 ऑक्टोबरला; Flipkart Big Diwali Sale अंतर्गत पहा काय आहेत ऑफर्स
Oppo A33 smartphone (Photo Credits: Oppo)

अलिकडेच लॉन्च झालेला Oppo A33 2020 या स्मार्टफोनचा ऑनलाईन सेल पुढील आठवड्यात सुरु होणार आहे. या स्मार्टफोनचे वैशिष्ट्य म्हणजे यात 90Hz चा रिफ्रेश रेट (Refresh Rate) असणारा पंच होल डिस्प्ले (Punch-Hole Display), क्वॉलकॉम स्पॅनड्रगन 460 प्रोसेसर आणि 5,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. 29 ऑक्टोबरपासून या स्मार्टफोनचा सेल सुरु होणार असून सुरुवातीला हा फोन केवळ फ्लिपकार्टवर (Flipkart) उपलब्ध असेल. काही दिवसांनंतर हा फोन ऑफलाईनही खरेदसाठी उपलब्ध असेल.

Oppo A33 स्मार्टफोनच्या 3GB + 32GB या वेरिएंटची किंमत 11990 रुपये आहे. हा फोन खरेदी करण्यास इच्छुक असलेल्यांना फ्लिपकार्टचा बिग दिवाली सेल हा चांगला पर्याय आहे. हा सेल 29 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर दरम्यान सुरु असेल. (Flipkart Big Diwali Sale 2020 ला 29 ऑक्टोबर पासून सुरुवात; स्मार्टफोन्स, टीव्ही आणि इतर इलेक्ट्रॉनिक्स प्रॉडक्ट्सवर बंपर ऑफर)

Oppo A33 स्मार्टफोनमध्ये 6.5 इंचाचा एचडी+ पंच होल डिस्प्ले, 90Hz चा रिफ्रेश रेट आणि 720x1,600 पिक्सल रिजोल्यूशनसह देण्यात आला आहे. त्यासोबत यात octa-core Qualcomm Snapdragon 460 हा प्रोसेसर आहे. स्मार्टफोनमध्ये 3GB रॅम आणि 32GB इंटरनल मेमरी देण्यात आली आहे. मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने तुम्ही ही मेमरी 256GB पर्यंत वाढवू शकता. हा फोन अॅनरॉईड 10 वर आधारीत ColorOS 7.2 वर हा फोन कार्यरत आहे.

 

Oppo A33 smartphone (Photo Credits: Oppo)

यात ट्रिपर रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. 13MP चा प्रायमरी शूटर, 2MP चा डेप्थ सेंसर आणि 2MP चा मायक्रो शूटर कॅमेरा यात देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 8MP चा फ्रंट कॅमेरा दण्यात आला आहे. 5000 mAh ची बॅटरी 18W च्या फास्ट चार्जिंग सपोर्टसह देण्यात आली आहे. त्याचबरोबर या स्मार्टफोनमध्ये फिंगरप्रिंट सेन्सरही देण्यात आला आहे.

Oppo A33 स्मार्टफोनचा 3GB + 32GB या वेरिएंट 11990 रुपयांना उपलब्ध आहे. कोटक बँक, रायबीएल बँक, बँक ऑफ बडोदा, फेडरल बँक यांच्या कार्ड्सवरुन खरेदी केल्यास 5% डिस्काऊंट मिळेल. ऑफलाईन खरेदी करु इच्छिणाऱ्यांना बजाज फिनसर्व्ह, होम क्रेडिट, एचडीबी फायनान्शियल सर्व्हिसेस, आयडीएफसी फर्स्ट बँक, एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँक यांच्या वेगवेगळ्या स्किम्समधून डिस्काऊंट मिळू शकतो.