गेल्या अनेक दिवसांपासून Oneplus च्या चाहत्यांना उत्सुकता लागली होती ती त्याच्या आगामी स्मार्टफोन वनप्लस 9 सीरिजची... दरम्यान चाहत्यांची ही उत्कंठा आणखी ताणून न ठेवता Oneplus India ने आपल्या ट्विटर हँडलवरुन या स्मार्टफोनचा फर्स्ट लूक रिव्हील केला आहे. या पोस्टमध्ये OnePlus 9 सीरिज उलटा दाखवला आहे. या फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा आणि रियर माउंटेड फिंगरप्रिंट सेंसरसुद्धा पाहू शकता. Oneplus India च्या या पोस्टवर युजर्सने देखील मजेशीर रिएॅक्शन दिले आहे.
आज सकाळी OnePlus India ने आपल्या ट्विटर पेजवर या स्मार्टफोनचा फर्स्ट लूक रिलीज केला आहे. 6 चे उलटे 9 असतात म्हणून कंपनीने एक मजेशीर पद्धतीने ही पोस्ट केली आहे.हेदेखील वाचा- Reliance Jio च्या 249 रुपयांच्या रिचार्जमध्ये युजर्सला मिळणार 56GB डेटासह अनलिमिटेड कॉलिंग
Your first look at the #OnePlus9Series. pic.twitter.com/atNdguVFEu
— OnePlus India (@OnePlus_IN) March 13, 2021
OnePlus 9 Series च्या संभाव्य वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, यात 5G नेटवर्क सपोर्ट असू शकतो. याच्या कॅमे-याविषयी याआधीच माहिती मिळाली आहे. तसेच यात कर्व्ड डिस्प्ले आणि पंच होल सुद्धा असू शकतात. स्क्रीनचा टॉप डाव्या बाजूला असेल. स्मार्टफोनमध्ये पॉवर बटन आणि अलर्ट स्लायडर उजव्या बाजूला असेल. त्याचबरोबर आवाजाचे बटणही असेल.
दरम्यान जानेवारी महिन्यात वनप्लस बड्स झेड स्टीव्हन हॅरिंग्टन (OnePlus Buds Z Steven Harrington) लिमिटेड एडिशन लाँच केले आहे. या इअरबड्सची रचना लास एंजेलिसमधील कलाकार आणि डिझायनर हॅरिंगटन यांनी केली आहे. याची किंमत 3,699 रुपये आहे. हे इअरबड्स OnePlus.in आणि OnePlus Store App वर विक्रीसाठी उपलब्ध असतील.