OnePlus 8 5G स्मार्टफोनचा आजपासून सेल सुरु होत आहे. अॅमेझॉन इंडिया (Amazon India) आणि वनप्लस इंडिया (OnePlus India) या वेबसाईटवरुन दुपारी 12 पासून या सेलचा लाभ घेता येईल. स्मार्टफोन खरेदीसाठी इच्छुक असलेल्यांना या सेल अंतर्गत चांगल्या ऑफर्स मिळतील. SBI बँकेच्या कार्डने पेमेंट केल्यास 2 हजार रुपयांचे डिस्काऊंट देण्यात येईल. त्याचप्रमाणे हा स्मार्टफोन प्रमुख बँकेच्या कार्डद्वारे ईएमआयवर देखील घेऊ शकता. प्री बुकींग केलेल्या ग्राहकांना 1000 रुपये अतिरिक्त अॅमेझॉन पे कॅशबॅक मिळणार आहे.
OnePlus 8 5G स्मार्टफोनमध्ये 6.55 इंचाचा FHD+ AMOLED डिस्प्ले देण्यात आला असून 90Hz चा रिफ्रेश रेट आहे. त्याचप्रमाणे मोबाईलचे स्क्रीन रेजोल्यूशन 2400x1080 पिक्सल इतके आहे. या मोबाईलमध्ये Qualcomm's Snapdragon 865 चिपसेट असून हा मोबाईल ग्लेशियल ग्रीन, इंटरस्टेलर ग्लो आणि ऑनिक्स ब्लॅक या रंगात उपलब्ध आहे. फोटोग्राफीसाठी OnePlus 8 5G मध्ये 48MP चा कॅमेरा देण्यात आला आहे. तसंच 16 MP चा अल्ट्रा वाईल्ड एन्गल लेन्स आणि 2MP मायक्रो शूटर कॅमेरा देण्यात आला आहे.
OnePlus India Tweet:
A gentle reminder to eat healthy and be on time for the OnePlus 8 5G sale at 12PM today.#ShotOnOnePlus pic.twitter.com/nkCnKiuCa5
— OnePlus India (@OnePlus_IN) June 4, 2020
या स्मार्टफोनमध्ये 16MP चा सेल्फी कॅमेरा देण्यात आला असून हा स्मार्टफोन तीन वेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. 6GB RAM + 128GB स्टोरेज, 8GB RAM + 128GB स्टोरेज आणि 12GB RAM + 256GB स्टोरेज. या व्यतिरिक्त स्मार्टफोनमध्ये 5G, 4G LTE, वायफाय 6, ब्लुट्युथ 5.1,NFC Support देण्यात आला आहे. तसंच OnePlus 8 5G स्मार्टफोनमध्ये 4,300mAh ची बॅटरी असून 30W चार्चिंग कॅपेसिटी देण्यात आली आहे. OnePlus 8 5G स्मार्टफोनच्या 6GB RAM + 128GB च्या वेरिएंटची किंमत 41,999 रुपये असून 8GB RAM + 128GB वेरिएंटची किंमत 44,999 रुपये आणि 12GB RAM + 256GB वेरिएंटची किंमत 49,999 रुपये इतकी आहे.