OnePlus 7 Pro चा आज पहिला फ्लॅश सेल; Amazon Prime मेंबर्ससाठी फोन खरेदीची खास संधी
OnePlus 7 Pro (Photo Credits: WinFuture)

OnePlus 7 Pro स्मार्टफोनचा आज भारतात पहिला फ्लॅश सेल असून तुम्ही जर हा मोबाईल खरेदी करु इच्छित असाल तर तुमच्यासाठी ही खास संधी आहे. आज दुपारी 12 वाजल्यापासून OnePlus 7 Pro हा स्मार्टफोन Amazon वर खरेदीसाठी उपलब्ध असेल. या पहिल्या फ्लॅश सेलमध्ये Amazon Prime मेंबर्स हा फोन खरेदी करु शकतात. त्याचबरोबर Oneplus Early Birds Sale देखील आजपासून Oneplus India च्या वेबसाईटवर दुपारी 12 पासून सुरु झाला आहे. हा सेल नॉन प्राईम मेंबर्ससाठी देखील उपलब्ध असेल. SBI ग्राहकांना यावर कॅशबॅक मिळेल. याशिवाय नो-कॉस्ट EMI, एक्सचेंज ऑफर्स आणि अन्य ऑफर्स देखील उपलब्ध होतील.

OnePlus 7 Pro च्या 6GB+128GB वेरिएंटची किंमत 48,999 रुपये आहे. तर 8GB+256GB वेरिएंटची किंमत 52,999 रुपये आहे. तसंच 12GB+256GB वेरिएंट 57,999 रुपयांना उपलब्ध होईल. OnePlus 7 Pro हा स्मार्टफोन नेबुला ब्लू, एलमंड आणि मेरी ग्रे या तीन रंगात लॉन्च करण्यात आला आहे.

ऑफर्स

OnePlus 7 Pro वर रियालन्स जिओच्या युजर्सला Jio-OnePlus 7 Series Beyond Speed Offer अंतर्गत 9300 रुपयांचा फायदा होईल. यात युजर्सला 299 पेक्षा कमी किंमतीच्या प्रीपेड रिचार्जवर 5,400 रुपयांचे इंस्टन्ट कॅशबॅक मिळेल.

Jio Oneplus ऑफरचा फायदा घेणाऱ्या युजर्संना 36 व्हाऊचर्सच्या स्वरुपात कॅशबॅक मिळेल. प्रत्येक कूपन 150 रुपयांचे असेल आणि हे व्हाऊचर्स माय जिओ अॅपमध्ये क्रेडिट होतील. तुम्ही www.jio.com, रिलायंस डिजिटल स्टोर्स, माय जियो स्टोर्स, जियो रिटेलर्स किंवा माय जिओ अॅपच्या माध्यमातून रिचार्ज करु शकता.

फिचर्स

OnePlus 7 Pro या स्मार्टफोनमध्ये 6.67 इंचाचा Fluid AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. यात फुल व्हू डिस्प्ले शिवाय OnePlus 6T प्रमाणे इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर देखील देण्यात आला आहे. OnePlus 7 Pro स्मार्टफोन तीन रॅम ऑप्शन आणि दोन इंटरनल स्टोरेज सह सादर करण्यात आला आहे. तसंच हा स्मार्टफोन 128GB आणि 256GB इनबिल्ट स्टोरेज ऑप्शनसह उपलब्ध आहे. यात क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 855 चिपसेट प्रोसेसर देण्यात आला आहे. यात 4,000mAh दमदार बॅटरी असून हा फोन डॅश चार्जिंगला देखील सपोर्ट करतो. (OnePlus 7 Pro स्मार्टफोन भारतात लॉन्च; पाहा किंमत फिचर्स आणि बरंच काही)

कॅमेरा

या स्मार्टफोनमध्ये मागे ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला असून याचा प्रायमरी रिअर कॅमेरा 48 मेगापिक्सलचा आहे. यात 8 मेगापिक्सलचा टेलिफोटो लेन्स देण्यात आली आहे. सेकेंडरी रिअर कॅमेऱ्यात f/2.2 अपर्चर सह OIS सेंसर देण्यात आला आहे. फोनमध्ये अजून एक 16 मेगापिक्सलचा व्हाईड एँगल लेन्स देण्यात आली आहे. हे PDAF (फेज डिटेक्शन ऑटो फोकस) सेंसर आहे. फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा पॉप अप सेल्फी कॅमेरा 3X ऑप्टिकल झूमसह देण्यात आला आहे.