आता Blinkit 12 मिनिटांत घरापर्यंत पोहोचवेल Ceiling Fans; नेटीझन्स म्हणाले, '10 मिनिटांमध्ये तर अ‍ॅब्यूलन्सपण येत नाही'
Blinkit, ceiling fans (PC - FB/Wikimedia Commons)

Blinkit Will Deliver Ceiling Fans in 12 Minutes: ब्लिंकिट (Blinkit)ने ऊर्जा-कार्यक्षम घरगुती उपकरणे बनवणारी कंपनी ॲटमबर्गच्या सहकार्याने आता फक्त 12 मिनिटांत छतावरील पंख्यांची डिलिव्हरी (Ceiling Fans Delivery) देणार आहे. ब्लिंकिटच्या सीईओने या बातमीची पुष्टी केली आहे. मात्र, या घोषणेनंतर ब्लिंकिटला सोशल मीडिया वापरकर्त्यांच्या ट्रोलिंगला सामोरे जावे लागले. Atomberg चे संस्थापक सदस्य आणि मुख्य व्यवसाय अधिकारी यांनी X वरील एका पोस्टमध्ये यासंदर्भात घोषणा केली. त्यांनी लिहिले की, 'आता ब्लिंकिटवर लाइव्ह. 12 मिनिटांत डिलिव्हरी. या उन्हाळ्यात आम्ही किती विक्री करतो ते पाहू.'

ब्लिंकिटचे सीईओ अलबिंदर धिंडसा यांनी 11 एप्रिल रोजी त्यांच्या X प्रोफाइलमध्ये ही पोस्ट पुन्हा शेअर केली आणि बातमीची पुष्टी करताना म्हटलं की, "अरिंदम आणि टीम ॲटमबर्ग किती चांगल्या प्रकारे तयार करत आहेत हे पाहण्यास उत्सुक आहे. त्यांच्या प्रवासाचा एक भाग असल्याचा आनंद आहे. ही पोस्ट ऑनलाइन शेअर केल्यापासून, पोस्टला X वर सुमारे 29k व्ह्यू मिळाले आहेत. मात्र, नेटीझन्सही कंपनीला ट्रोल करत त्यांच्या शंका मांडल्या आहेत. (हेही वाचा -Blinkit: अब्बब!! दक्षिण दिल्लीतील ग्राहकाने ब्लिंकिटवरून मागवले 9,940 कंडोम; 'ब्लिंकिट ट्रेंड्स 2023' च्या अहवालात खुलासा)

आता मी 10 मिनिटांत पंखा वितरित केला आहे. ॲटमबर्गच्या कर्मचाऱ्याला स्थापित करण्यासाठी किती दिवस लागतील? असा खोचक प्रश्न एका नेटीझन्सने विचारला आहे. ब्लिंकिट 'इलेक्ट्रिशियन सेवा + फॅन' पर्यायी पॅकेज म्हणून जोडू शकते, अशी देखील कमेंट्स एका व्यक्तीने केली आहे.

दुसऱ्या एका यूजर्सने म्हटलं आहे की, 'लवकरच ब्लिंकिट एअर कंडिशनर्सचीही विक्री सुरू करेल.' तुम्ही लोकांनी एअर कूलर आणि इतर विभागांवर देखील लक्ष केंद्रित केले पाहिजे. बंगळुरूमध्ये उष्णता असह्य आहे. मला खात्री आहे की याला मागणी आहे. पण चांगली उत्पादने नाहीत, असंही एका वापरकर्त्याने म्हटलं आहे.