Nokia 3.4 (Mukul Sharma @stufflistings via Twitter)

नोकियाच्या नवीन स्मार्टफोन Nokia 3.4 ची वाट पाहणार्‍या वापरकर्त्यांसाठी एक चांगली बातमी आहे. हा स्मार्टफोन आज पहिल्यांदाच म्हणजे 20 फेब्रुवारी रोजी विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. हा स्मार्टफोन काही दिवसांपूर्वी भारतीय बाजारात लाँच करण्यात आला होता. तसेच लाँचिंगसोबतचं हा स्मार्टफोन प्री-बुकिंगसाठीही उपलब्ध करुन देण्यात आला होता. ज्यानंतर आज तो पहिल्यांदा विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. स्मार्टफोनच्या या बजेट रेंजमध्ये आपल्याला उत्कृष्ट कॅमेरा सेटअप ते उत्कृष्ट बॅटरी बॅकअप सारख्ये बरेच खास वैशिष्ट्ये मिळणार आहेत. (वाचा - Motorola कंपनीचा 5000mAh बॅटरी असलेला स्वस्त स्मार्टफोन Moto E7 Power भारतात लाँच, काय आहे किंमत?)

Nokia 3.4 किंमत आणि उपलब्धता -

नोकिया 3.4 भारतात एकच व्हेरिएंटमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. यात 4 जीबी रॅमसह 64 जीबीचे अंतर्गत स्टोरेज आहे आणि त्याची किंमत 11,999 रुपये आहे. हा स्मार्टफोन तीन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध असेल. कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळाव्यतिरिक्त, वापरकर्ते ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्ट आणि Amazon वर या स्मार्टफोनची खरेदी करू शकतात. हा स्मार्टफोन येत्या काही दिवसात किरकोळ स्टोअरमध्ये विक्रीसाठी उपलब्ध करुन देण्यात येईल.

Nokia 3.4 स्पेसिफिकेन्स -

Nokia 3.4 हा कंपनीचा अर्फोडेबल स्मार्टफोन आहे आणि त्यात 6.4 इंचाचा डिस्प्ले आहे जो 720 x 1560 पिक्सेलच्या स्क्रीन रिझोल्यूशनसह आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइड 10 ओएस वर कार्य करतो. उत्कृष्ट कार्यक्षमतेसाठी यात क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 460 चिपसेट वापरण्यात आला आहे. फोनमध्ये व्हिडिओ कॉलिंग आणि सेल्फीसाठी वापरकर्त्यांना पंच होल डिझाइनसह 8 एमपीचा फ्रंट कॅमेरा मिळेल.

नोकिया 3.4 मध्ये ट्रिपल रीअर कॅमेरा सेटअप आहे. त्याचे प्राथमिक सेन्सर 13 एमपी आहे, तर 5 एमपी अल्ट्रा वाइड एंगल लेन्स आणि 2 एमपी खोलीचे सेन्सर आहेत. या स्मार्टफोनची बॅटरी 4,000 एमएएच आहे. यात कनेक्टिव्हिटी फीचर्स म्हणून ब्लूटूथ आणि वायफाय देण्यात आले आहेत.