Netflix StreamFest 2020 चा लाभ घेण्याची पुन्हा एकदा संधी! 11 डिसेंबर 2020 पर्यंत सुरु राहणाऱ्या फेस्टमध्ये मोफत सिनेमे, शोज कसे पाहाल?
Netflix logo (Photo credit: twitter)

नेटफ्लिक्स (Netflix) या ओटीटी फ्लॅटफॉर्म (OTT Platform) ने भारतीय युजर्स साठी (Indian Users) गेल्या आठवड्यात फ्री स्ट्रिमिंग (Free Streaming) सादर केले होते. याला भरगोस प्रतिसाद मिळाल्याने काही युजर्संना या फ्री स्ट्रिमिंगचा उपभोग घेता आला नाही आणि त्यांना स्क्रीनवर 'StreamFest Is At Capacity' हा मेसेज दिसू लागला. यामुळे निराश झालेल्या युजर्संना खूश करण्यासाठी नेटफ्लिक्सने स्ट्रिमफेस्टची मूदत वाढवण्याचा निर्णय घेतला. दुसरा स्ट्रिमफेस्ट आज सकाळी 9 वाजता सुरु झाला असून 11 डिसेंबर 2020 सकाळी 9 वाजेपर्यंत चालू राहणार आहे.

स्ट्रिमफेस्ट अंतर्गत युजर्स कोणत्याही प्रकारचे अकाऊंट न बनवता नेटफ्लिक्सवरील सर्व चित्रपट आणि वेब सिरीज मोफत पाहू शकतात. त्याचप्रमाणे हिंदीमध्ये UI चेंज करणे, कोणतेही सबटायटल सिलेक्ट करणे आणि प्रोफाईल्स क्रिएट करणे यांसारख्या फिचरचा सुद्धा उपभोग घेऊ शकतात. (Netflix वर 'StreamFest Is At Capacity' मेसेजमुळे फ्री शो पाहण्याची संधी हुकलेल्या युजर्ससाठी अजून 2 दिवस मिळणार फ्री स्ट्रिमिंग)

नेटफ्लिक्स स्ट्रिमफेस्टचा लाभ घेण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा:

# तुमच्या स्मार्टफोनमध्ये नेटफ्लिक्सचा अॅप डाऊनलोड करा किंवा नेटफ्लिक्सच्या वेबसाईटला भेट द्या.

# जर तुमच्याकडे नेटफ्लिक्सचे अकाऊंट असेल तर ते वापरुन लॉन इन करा.

# नेटफ्लिक्सचे अकाऊंट नसल्यास ई-मेल आयडी, फोन नंबर वापरुन नेटफ्लिक्सचे अकाऊंट क्रिएट करा.

# यशस्वीरीत्या लॉग इन झाल्यानंतर तुम्ही तुमचे आवडते शोज मोफत पाहू शकाल.

पूर्वी नेटफ्लिक्सचा मोफत लाभ घेण्याची संधी हुकलेल्यांसाठी ही मोठी संधी आहे. दोन दिवस चालणाऱ्या या स्ट्रिमफेस्टचा युजर्स पुरेपूर लाभ घेतील, यात शंकाच नाही. दरम्यान, यापूर्वी नेटफ्लिक्सने स्ट्रिमफेस्ट घोषित केल्यानंतर युजर्सने त्यावर उड्या मारल्या होत्या. यावर भन्नाट मीम्स आणि जोक्सही व्हायरल झाले होते. युजर्सचा प्रतिसाद पाहून कंपनीकडून अजून दोन दिवसांसाठी स्टिमफेस्ट घोषित करण्यात आला आहे.