Netflix | Representational Image (Photo Credits: Pixabay)

नेटफ्लिक्स डाऊन (Netflix Down) झाल्याने सुमारे 11,000 हून अधिक वापरकर्त्यांना समस्यांचा सामना करावा लागतो आहे. आउटेज ट्रॅकिंग वेबसाइट Downdetector.com ने दिलेल्या माहितीनुसाह नेटफ्लिक्स डाऊनची समस्या युनायटेड स्टेट्स ( United States) मधील वापरकर्त्यांना भेडसावत आहे. ही समस्या प्रामुख्याने रविवारी रात्री उशीरपासून भेडसावत आहे. प्राप्त माहितीनुसार, पहाटे 5 वाजल्यापासून डाऊन झालेली Netflix Inc. साधारण सकाळी 6.49 वाजता पूर्ववत झाली.

वृत्तसंस्था रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, 11,000 पेक्षा जास्त यूएस वापरकर्त्यांसाठी Netflix काही काळासाठी बंद झाले. ज्यामुळे अनेक वापरकर्त्यांनी ट्विटरवरुन नेटफ्लिक्स बंद असल्याबाबत तक्रारी नोंदवल्या. एक वापरकर्ता म्हणाला, " मझ्याजवळ एक नेटफ्लिक्स वापरण्यासाठी एक पूर्ण संचच होता. दुसर्‍या वापरकर्त्याने लिहिले की, मी इनपेशंट आहे. तिसरा वापरकर्ता म्हणाला, नेटफ्लिक्सने त्याच्या किमतीत वाढ केली आहे. अनेकांनी नेटफ्लिक्सची ट्विटरवर आणि इतरही काही सोशल मीडियावर खिल्ली उढवली. (हेही वाचा, Netflix ने Password Sharing वर या 4 देशांमध्ये आणले निर्बंध)

ट्विट

नेटफ्लिक्स डाऊन झाल्याने 'लव्ह इज ब्लाइंड: द लाइव्ह रियुनियन' च्या स्ट्रीमिंगला एक तासापेक्षा जास्त उशीर झाला, असे मत Downdetector नोंदवले आहे. 'लव्ह इज ब्लाइंड: द लाइव्ह रियुनियन' हा नेटफ्लिक्सचा थेट प्रक्षेपीत होणारा दुसरा कार्यक्रम होता. दरम्यान, त्रुटी दूर केल्यानंतर Netflix ने 9:30 pm (ET) वाजता ट्विटरवर माफी मागितली आणि म्हटले की, कार्यक्रम आता चित्रीत केला जात आहे. नेटफ्लिक्सने दिलगीरी व्यक्त करत म्हटले की, एक धमाकेदार रिअॅलिटी डेटिंग शो, रविवारी रात्री Netflix वर एका तासापेक्षा जास्त उशीर झाला, जी लाइव्ह प्रोग्रामिंगसह प्रयोग करत असलेल्या स्ट्रीमिंग सेवेसाठी एक लाजिरवाणी चूक होती.

ट्विट

ट्विट

ट्विट

नेटफ्लिक्स (Netflix)

नेटफ्लिक्स (Netflix) ही एक स्ट्रीमिंग सेवा आहे. जी तिच्या सदस्यांना विविध प्रकारचे टीव्ही शो, चित्रपट, माहितीपट आणि इतर सामग्री ऑफर करते. नेटफ्लिक्सची स्थापना युनायटेड स्टेट्समध्ये 1997 मध्ये डीव्हीडी-बाय-मेल सेवा म्हणून करण्यात आली होती. परंतु 2007 मध्ये नेटफ्लिक्सने त्यांची स्ट्रीमिंग सेवा सुरू केली. तेव्हापासून ते जगातील सर्वात लोकप्रिय स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मपैकी एक बनले आहे.

आजघडीला Netflix 190 पेक्षा जास्त देशांमध्ये उपलब्ध आहे. जगभरात त्याचे 200 दशलक्ष पेक्षा जास्त सदस्य आहेत. हे मूळ प्रोग्रामिंगसह विस्तृत सामग्री प्रदान करते. जे सेवेचे वैशिष्ट्य बनले आहे. काही सर्वात लोकप्रिय नेटफ्लिक्स मूळ मालिकांमध्ये स्ट्रेंजर थिंग्ज, द क्राउन, नार्कोस आणि ऑरेंज इज द न्यू ब्लॅक यांचा समावेश आहे. स्मार्टफोन, टॅब्लेट, स्मार्ट टीव्ही आणि गेमिंग कन्सोलसह विविध उपकरणांद्वारे ही सेवा उपलब्ध आहे. Netflix वापरकर्त्यांना ऑफलाइन पाहण्यासाठी सामग्री डाउनलोड करण्यास देखील अनुमती देते, जे विशेषतः जाता जाता लोकांसाठी उपयुक्त आहे.