SpaceX Crew-1 Resilience set for launch on Sunday (Photo Credits: Twitter)

स्पेसएक्स (SpaceX) आणि नासा (NASA) नेआपल्या पहिल्या ऑपरेशनल स्पेस टॅक्सी फ्लाईटचे (Operational Space Taxi Flight) यशस्वीरित्या लॉन्चिंग केले आहे. फ्लोरिडा येथील कॅनेडी स्पेस सेंटर (Kennedy Space Center) मधून काल रात्री फाल्कन-9 (Falcon 9) रॉकेटने चार अंतराळवीरांना घेऊन उड्डाण केले. नासा आणि स्पेसएक्स ने चार अंतराळवीरांनासह पहिले ऑपरेशनल कमर्शियल क्रु मिशन (Operational Commercial Crew Mission) लॉन्च केले आहे. दोन्ही अंतराळ एजन्सीने नासाच्या इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमधून ही मोठी झेप घेतली. दरम्यान, प्रतिकूल वातावरणामुळे स्पेसएक्सचे क्रू- ड्रॅगन चे 24 तास उशिरा उड्डाण झाले.

या मिशनमधून नासाचे तीन अंतराळवीर माईक हॉपकिंस (Mike Hopkins), विक्टर ग्लोवर (Victor Glover), शैनन वॉकर (Shannon Walker)आणि जपानचा एक अंतराळवीर सोइची नोगुची (astronaut Soichi Noguchi) गेले आहेत. हे सर्व अटलांटिक महासागरातून ड्रॅगन कॅप्सूलच्या मदतीने पृथ्वीवर परततील.

पहा व्हिडिओज:

याआधी 45 वर्षांपूर्वी अमेरिकेच्या अंतराळवीरांनी पहिले स्पलॅशडाऊन उतरवले होते. या मोहिमेतून अंतराळवीर पॅराशूटच्या माध्यमातून समुद्रात उतरले होते. एलन मस्कची कंपनी स्पेसएक्सने नासाच्या अंतराळवीर बॉब बेनके (49) आणि  डॉ हर्ले (53) यांना अंतराळातील प्रयोगशाळा आंतरराष्ट्रीय अवकाश स्टेशन्सवर पोहचवल्याची पृष्टी केली होती. हे दोन्हीही अंतराळवीर ड्रॅगन कॅप्सूलमधून पृथ्वीवर परतले होते. स्पेसएक्सच्या अंतराळवीरांच्या या यशस्वी प्रवासानंतर पुढील काही वर्षात अंतराळात पर्यटन उड्डाणांसाठीचा मार्ग मोकळा होताना दिसत आहे.