Motorola One Fusion+ Online Sale आज दुपारी 12 पासून Flipkart वर सुरु; पहा स्पेसिफिकेशन्स, किंमत आणि ऑफर्स
Motorola One Fusion Plus (Photo Credits: Flipkart)

Motorola One Fusion+ चा आज सेल आज दुपारी 12 वाजल्यापासून फ्लिपकार्टवर सुरु होत आहे. या सेल अंतर्गत स्मार्टफोनवर 2500 रुपयांचा डिस्काऊंट मिळत आहे. तसंच अॅक्सिस बँक क्रेडिट कार्ड (Axis Bank Credit Cards) वापरुन खरेदी केल्यास 5% अनलिमिडेट कॅशबॅक मिळत आहे. तर अॅक्सिस बँक बझ क्रेडिट कार्ड (Axis Bank Buzz Credit Cards) वापरुन खरेदी केल्यास 5% सूट दिली जात आहे. तसंच सेलमध्ये खरेदी करण्यासाठी नो-कॉस्ट ईएमआय (No-Cost EMI) आणि सॅंडर्ड ईएमआयचा (Standard EMI) पर्यायही दिला जात आहे. त्याचप्रमाणे या ऑफरमध्ये तुम्ही Google Nest Mini Charcoal फक्त 1,999 रुपयांना विकत घेऊ शकता.

या स्मार्टफोनमध्ये 6.5 इंचाचा फुल एचडी + IPS TFT LCD Notch-less डिस्प्ले दिला आहे. याचे रिजोल्यूशन 2340x1080 पिक्सल इतके आहे. या स्मार्टफोनमध्ये 6.5 इंचाचा फुल एचडी + IPS TFT LCD Notch-less डिस्प्ले दिला आहे. याचे रिजोल्यूशन 2340x1080 पिक्सल इतके आहे. या स्मार्टफोनमध्ये चार कॅमेरे असून 64MP चा प्रायमरी शूटर, 8MP चा अल्ट्रा वाईल्ड एँगल लेन्स, 5MP चा मॉक्रो विशन लेन्स देण्यात आली आहे. तर 2 MP चा डेप्थ सेन्सरही आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 16MP चा पॉप-अप कॅमेरा देण्यात आल आहे.

प्रोसेसर  क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 730G SoC
रॅम  6GB
इंटरनल स्टोरेज (मेमरी)  128GB
बॅटरी 5,000mAh
बॅक कॅमेरा 64MP, 8MP, 5MP, 2MP
सेल्फी कॅमेरा 16MP
चार्जिंग सपोर्ट 18W turbo power

Motorola Fusion One Plus India Launch (Photo Credits: Motorola India Twitter)
Motorola One Fusion Plus India Launch Today (Photo Credits: Flipkart)

Motorola One Fusion+ मध्ये 5,000mAh ची बॅटरी असून 18W turbo power चार्जिंगची सुविधा देण्यात आली आहे. हा स्मार्टफोन अॅनरॉईड 10 या ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. तसंच या स्मार्टफोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 730G SoC हा प्रोसेसर दिला असून यामध्ये 6GB रॅम आणि 128GB ची इंटरनल मेमरी देण्यात आली आहे. 18W turbo power च्या 6GB आणि 12GB वेरिएंटची किंमत 17,499 रुपये आहे.