लोकप्रिय टिक टॉक अॅपला टक्कर देण्यासाठी प्ले स्टोअरवर (Play Store) असेच व्हिडिओ बनवण्याचे एक अॅप उपलब्ध आहे. हे अॅप पूर्णतः भारतीय आहे. टिकटॉक सारखेच शोर्ट व्हिडिओ मेकिंग बनवणाऱ्या अॅपचं नाव मित्रों अॅप (Mitron App) असं आहे. या अॅपने सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. आतापर्यंत 50 लाख पेक्षा जास्त युजर्संनी हे अॅप डाऊनलोड केलं आहे.
भारतीय युजर्संकडून या अॅपला चांगली पंसती मिळत आहे. भारताला सपोर्ट करण्यासाठी अनेकांनी हे अॅप डाऊनलोड केलं आहे. एक महिन्यापूर्वी मित्रो हे अॅप लाँच करण्यात आले होते. (हेही वाचा - Mitron App: आता TikTok ला विसरा, व्हिडिओ बनवण्यासाठी सादर आहे भारतीय 'मित्रों अॅप'; जाणून घ्या याच्या वापरासाठी Step-by-Step Guide (Video))
सोशल मीडियावर हाताळण्यासाठी अत्यंत सोपं असणारं अॅप सध्या लोकप्रिय ठरत आहे. मित्रोंची रचना आयआयटी रुरकीच्या विद्यार्थ्याने केली आहे. एका महिन्यातच, हे अॅप 5 दशलक्षांहून अधिक वेळा डाउनलोड केले गेले आहे. तसेच Google Play Store वरील उत्कृष्ट अॅप मध्ये या अॅपचा समावेश झाला आहे.
दरम्यान, युट्युब विरुद्ध टिकटॉक विवाद आणि त्यानंतर टिकटॉक वरील बंदीची मागणीमुळे मित्रों कमी वेळेत जास्त लोकप्रिय झाले आहे. गुगल प्ले स्टोरवर मित्रो अॅप सातव्या नंबरवर दिसत आहे. यात पहिल्या नंबरवर आरोग्य सेतु हे अॅप दिसत आहे. मित्रो अॅपला टिक टॉक पेक्षा जास्त रेटिंग्स मिळाली आहे. टिक टॉकला 1.6 रेटिंग मिळाली असून मित्रों अॅपला 4.7 रेटिंग मिली आहे.