सध्या सोशल मीडियात सर्वात युजर्सच्या पसंदीचे अॅप इंन्स्टाग्राम याचा वापर फेसबुकपेक्षा जास्त केला जातो. मात्र इंन्स्टाग्रामवरील 4.9 कोटी युजर्सचा डेटा लीक झाल्याची माहिती समोर आली असून त्यामध्ये सेलिब्रेटींचा सुद्धा समावेश आहे.
मुंबई मधील सोशल मीडिया मार्केटिंग फर्म चटर बॉक्सने या डेटाबेसला ट्रेस केले आहे. या अहवालामध्ये युजर्सचा पर्सनल डेटा, फॉलोअर्सची संख्या, प्रोफाईल फोटोसह अन्य गोष्टीसुद्धा लीक झाल्या आहेत. परंतु टेक क्रंचने चटर बॉक्सने डेटा लीक केल्याचे उघड केल्यास त्यांनी आपले डेटाबेस ऑफलाईन केले.(ऑनलाईन खरेदीवर अशा पद्धतीने असते गुगल ची करडी नजर)
तर चटर बॉक्स ही कंपनी आपल्या अकाउंटवर पोस्ट करण्यासाठी प्रसिद्ध व्यक्तींना पैसे देत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे डेटा लीक झाल्याचा प्रकारामुळे इन्स्टाग्रामचे मालकी हक्क असलेल्या फेसबुकने याबद्दल अधिक चौकशी करणार असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.