मायक्रोसॉफ्ट लवकरच 'Windows 7' चा सपोर्ट बंद करणार
Microsoft (Photo Credit: Getty)

प्रसिद्ध टेक कंपनी मायक्रोसॉफ्टने (Microsoft) विंडोज 7 (Windows 7) चा सपोर्ट बंद करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता विंडोज 7 चे कॅम्प्युटर आणि लॅपटॉप कायमचे बंद होणार आहेत. मायक्रोसॉफ्ट मेनस्ट्रीम सपोर्ट बंद करणार असून 14 जानेवारी 2020 पासून विंडोज 7 चा सपोर्ट बंद करण्यात येईल. मायक्रोसॉफ्टच्या या निर्णयामुळे युजर्सला अपडेट्स मिळणार नाहीत. यात कॅम्प्युटर सुरक्षित ठेवणारे सिक्युरिटी फिक्स आणि पॅचेस यांचाही समावेश आहे.

कंपनी आता Windows 7 Extended Securrity Updates विकणार आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून विंडोज 7 वापरणाऱ्या युजर्सची गैरसोय होऊ शकते. तरी देखील तुम्ही विंडोज 7 वापर राहिल्यास तुमच्या कंप्म्युटर, लॅपटॉपची सुरक्षा धोक्यात येऊ शकते. हा धोका टाळण्यासाठी विंडोज 10 वापरण्याचे मायक्रोसॉफ्टने सुचविले आहे.

गेल्या वर्षी जून महिन्यात मायक्रोसॉफ्टने विंडोज 7 चा अधिकृत सपोर्ट काढून घेतला होता. त्यानंतर Windows 7 सादर झालं. नंतर Windows 8, Windows 8.1 सादर करण्यात आलं. 2015 मध्ये Windows 10 लॉन्च करण्यात आलं. सध्या विंडोज 10 वापरणाऱ्या युजर्सची संख्या 70 कोटींहून जास्त आहे.