Aadhaar, PAN Card सह अनेक महत्वाचे डॉक्युमेंट्स आता WhatsApp वरून करता येणार डाउनलोड, जाणून घ्या सविस्तर
WhatsApp | Representation Image (Photo Credits: Pixabay)

WhatsApp: व्हॉट्सअ‍ॅपच्या वापराचे प्रमाण आता झपाट्याने वाढले आहे, व्हॉट्सअ‍ॅपमध्ये आता नवीन वैशिष्ट्यांचा समावेश केला जात आहे. वैयक्तिक संवादासाठीचनव्हे तर व्यावसायिक कार्यांसाठीही व्हॉट्सअ‍ॅपचा वापर केला जातो. व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉट हे सुद्धा एक महत्त्वाचे संपर्क साधन बनले आहे. व्हॉट्सअ‍ॅप  चॅटबॉट देखील महत्त्वाचे डॉक्युमेंट्स  डाउनलोड करण्यासाठी एक उत्कृष्ट साधन बनले आहे. My Gov ही व्हॉट्सअ‍ॅपवरील चॅटबॉट-आधारित सेवा युजर्सना विविध महत्त्वाच्या कागदपत्र सेव्ह  करण्यासाठी डिजिलॉकर ही सेवा प्रदान करते. महत्वाची कागदपत्रे युजर्सच्या डिजिलॉकरमध्ये सेव्ह केल्यानंतर तुम्हीती कधीही डाउनलोड करू शकता. तुमचा WhatsApp क्रमांक तुमच्या आधार कार्डसह व्हेरिफाय करणे ही वन टाइम प्रोसेस आहे. त्यानंतर  तुमच्या डिजिलॉकर खात्याच्या तपशीलांची पडताळणी केली जाते. ही प्रोसेस केल्यानंतर युजर्स सुरक्षा कोड टाकून त्यांचे डॉक्युमेंट्स  डाउनलोड करू शकतात. WhatsApp अ‍ॅप वरून महत्वाचे कागदपत्रे डाउनलोड करण्यासाठी 9013151515 या नंबरवर 'HI' असा मेसेज सेंड करावा लागतो. त्यानंतर तुम्हाला जो डॉक्युमेंट डाउनलोड करायचा ते टाकावे आणि त्याची  पीडीएफ स्परुपातील फाईल तुम्हाला सेंड केली जाईल. [ हे देखील वाचा: Google Photo Security Feature: फोटो हाईड करण्यासाठी गुगलचा भन्नाट फिचर; आता गुगलच्या झेड सिक्युरिटत ठेवा तुमचे फोटो सुरक्षित ]

कोणते महत्त्वाचे दस्तऐवज डाउनलोड करू शकता, जाणून घ्या 

  • दहावीची मार्कशीट
  • बारावीची मार्कशीट
  • पॅन कार्ड
  • वाहन चालविण्याचा परवाना
  • COVID-19 लसीकरण प्रमाणपत्र
  • विमा पॉलिसी आणि वाहन आर.सी
  • आधार

डाउनलोड करण्याची प्रक्रिया 

9013151515 हा नंबर सेव्ह केल्यानंतर यावर फक्त 'हाय' असा मजकूर पाठवा. आता, OTP प्राप्त होईल. तुम्ही OTP टाकताच तुमची कागदपत्रे समोरून सेंड केली जाईल. यादीत दिलेली महत्वाची  कागदपत्राची  पीडीएफ स्परुपातील फाईल तुम्ही व्हॉट्सअ‍ॅच्या माध्यमातून डाउनलोड करू शकता. एका वेळी एकच डॉक्युमेंट तुम्हाला डाउनलोड करता येणार आहे. प्रत्येक वेळी नवीन डॉक्युमेंटसाठी hi पाठवावे लागेल.