लोकसभा निवडणूकीसाठी (Lok Sabha Elections) देशभरात विविध संस्था कामाला लागल्या आहेत. यामध्ये आता मतदारांच्या मदतीला 'फेसबुक'(Facebook) देखील सज्ज झाली आहे. मंगळवारी भारतामध्ये आगामी लोकसभा निवडणूकींच्या पार्श्वभूमीवर फेसबूककडून दोन खास टूल्स लॉन्च करण्यात आली आहेत. यामध्ये 'Candidate Connect' आणि 'Share You Voted' या दोन टूल्सचा समावेश आहे. Lok Sabha Election 2019 Dates: मुंबई, पुणे, नाशिक, कोकण मध्ये कधी आहे लोकसभा निवडणूक 2019 मतदान? पहा महाराष्ट्र राज्यातील 48 मतदारसंघाचं संपूर्ण वेळापत्रक
Candidate Connect
फेसबूक युजर्सला आता त्यांच्या न्यूजफीडवर त्यांच्या मतदार संघातील उमेदवारांची माहिती मिळणार आहे. यामध्ये उमेदवार जर ते निवडून आले तर काय करणार याची माहिती देणार आहेत. यासाठी फेसबूककडून काही प्रश्नांची यादी युजर्सना दिली जाणार आहे. त्यांच्या उत्तरांवरून एक व्हिडिओ बनवला जाईल. तो युजर्सना फेसबूक फीडवर दिसेल. यामुळे युजर्सना मतदानापूर्वी त्यांच्या मतदारसंघातील उमेदवारांची यादी मिळेल तसेच त्यांची व्हिजन आधीच समजल्याने उमेदवाराची निवड करणं सोप्प होईल. हा व्हिडिओ 20 सेकंदाचा असेल.
Share You Voted
मतदान हा भरतीयांचा अधिकार आहे. लोकशाही बळकट ठेवायची असेल तर प्रत्येक नागरिकाने मतदान करणं आवश्यक आहे. यासाठीच मतदान केल्यानंतर तुम्हांला फोटो क्लिक करून अपलोड करायचा आहे. फेसबूक या फोटोचा व्हिडिओ बनवून तो न्यूजफीडवर शेअर करणार आहे. यामुळे मतदानाबददल अधिकांधिक युजर्स प्रभावी होतील.
'Candidate Connect' आणि 'Share You Voted' ही दोन्ही टूल्स पुढील आठवड्यापासून उपलब्ध होतील. 10-12 भारतीय भाषांमध्ये हे टूल उपलब्ध होणार आहे. 20 सेकंदाचा व्हिडिओ न्यूजफीडवर किंवा सेटिंगमधील बूकमार्क या पर्यायावर उपलब्ध केला जाऊ शकतो.