Landline वरून Mobile Calls करण्यासाठी आजपासून नंबर आधी '0' डायल करणं अनिवार्य
Image For Representation (Photo Credits-Facebook)

लॅन्ड लाईन युजर्सना (Landline users)आज 15 जानेवारीपासून मोबाईल नंबर (Mobile Number) वर फोन करण्यापूर्वी 0 डायल करावा लागणार आहे. Ministry of Communications ने बुधवारी त्याचं पत्रक जारी केलं माहिती देताना आता 0 डायल करणं अनिवार्य असल्याचं म्हटलं आहे. यामुळे कंपन्यांना नव्या फोन नंबरचे पर्याय उपलब्ध होणार आहेत. नव्या नंबर डायलिंगच्या पद्धतीमुळे आरा मोबाईल सेवेमध्ये 254.4 कोटी नवे नंबर्स निर्माण होऊ शकणार आहेत. नोव्हेंबर 2020 मध्येच The Department of Telecommunications (DoT) ने याबद्दलची माहिती दिली होती आता आजपासून त्याची अंमलबजावणी सुरू होत आहे.

दरम्यान ही नंबर डायल करण्यापूर्वी 0 लावण्याची पद्धत ही केवळ लॅन्डलाईन वरून मोबाईल वर फोन लावण्यासाठी आहे. लॅन्डलाईन ते लॅन्डलाईन, मोबाईल ते लॅन्डलाईन किंवा मोबाईल ते मोबाईल अशा पद्धतीमध्ये तुम्हांला 0 लावण्याची गरज नाही. Reliance Jio वरून भारतातील कोणत्याही नेटवर्कवर 1 जानेवारी 2021 पासून voice calls होणार फ्री!

Economic Times च्या रिपोर्ट्स नुसार एअरटेल कडून त्यांच्या ग्राहकांना आता 15 जानेवारीपासून बदलेल्या नव्या नियमाची माहिती देण्यास सुरूवात झाल्याचं सांगण्यात आलं आहे. लवकरच वोडाफोन-आयडिया, रिलायंस जिओ, बीएसएनएल, एमटीएनएल कडून देखील ही माहिती देण्यास सुरूवात होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. दरम्यान क्म्युनिकेशन मिनिस्ट्रीकडून टेलिकॉम कंपन्यांना असं देखील सांगण्यात आले आहे की ग्राहकांना आठवण आणि नव्या बदलांची माहिती देण्यासाठी योग्य ऑटॉ अनाऊंटमेंटची देखील सोय करा. यामुळे कुणी या नव्या नियमांबद्दल अनभिज्ञ असेल तर त्यांना त्याची माहिती होईल आणि संपर्क करणं शक्य होणार आहे.