Google Play Store (Photo Credit mundoejecutivo.com)

गूगलने भारतामध्ये Kormo Jobs हे नवं अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप लॉन्च केले आहे. दरम्यान या अ‍ॅपच्या मदतीने देशभरात नोकरीची संधी शोधण्यांना माहिती पुरवली जाणार आहे. सध्या कोरोना व्हायरस संकटातून जाताना रोजगाराच्या नव्या संधी निर्माण झाल्या आहेत. तर काही ठिकाणी कामाचं स्वरूप आता बदललं आहे. त्यानुसार नव्या गरजांची पूर्तता करण्यासाठी नवी कौशल्य देखील शिकणं गरजेचे झाले आहे.

कोरोना व्हायरस संकटात न्यू नॉर्मल स्वीकारताना आता तरूणांना रोजगार क्षेत्रात झालेला नवा बदल देखील स्वीकरणं गरजेचे आहे. भारतामध्ये मागील वर्षी गूगल पे वर 'जॉब्स' चा पर्याय सुरू करण्यात आला होता. यामध्ये ऑन डिमांड बिझनेस, रिटेल, हॉस्पिटॅलिटी यामधील संधी दाखवल्या जातात आता त्याच रिब्रॅन्ड करून Kormo Jobs म्हणून जाहीर केल्या जातील. Salaried Job Cuts: कोरोना विषाणूमुळे भारतामध्ये एप्रिल पासून 1.89 कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्या; जुलैमध्ये 50 लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या – CMIE.

गूगल कडून पहिल्यांदा Kormo Jobs हे अ‍ॅप 2018 साली बांग्लदेश, 2019 साली इंडोनेशियामध्ये उपलब्ध करण्यात आले होते. भारतामध्ये 'Jobs as a Spot' ही सेवा गूगल पे वर सुरू करण्यात आली. गूगलच्या ब्लॉग मध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार, डन्झो, झोमॅटो यासारख्या कंपन्यांना त्यांच्या लोकेशननुसार, पात्रतेनुसार कामगार येथेच मिळाले आहेत. या सर्व्हिसचा वापर करून सुमारे 2 मिलियन व्हेरिफाईड जॉब्स पोस्ट करण्यात आले आहेत.

भारतामध्ये आता कोविड नंतर पुन्हा अर्थव्यवस्थेची घडी बसवताना येणारी आव्हानं पाहून आता गूगल पे वरच Kormo Jobs मध्ये तरूणांना नोकरीची संधी आणि त्याची उपलब्धता याची माहिती दिली जाणार आहे. नव्या सेवांसाठी आवश्यक स्किल्स आणि अनुभव यानुसार या सेवा असतील. National Recruitment Agency ला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी; नॉन गॅझेट सरकारी आणि पब्लिक सेक्टर बॅंकेमधील पदांसाठी एकच CET परीक्षा.

कोरोना संकटकाळामध्ये सारेच व्यवसाय न्यू नॉर्मलच्या आव्हानांचा सामना करत आहेत. तर भारतामध्ये नोकरदारंनाही झालेले बदल लवकर स्वीकारावे लागणार आहेत.