National Recruitment Agency ला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी; नॉन गॅझेट सरकारी आणि पब्लिक सेक्टर बॅंकेमधील पदांसाठी एकच  CET परीक्षा
Union Minister Prakash Javadekar briefing media about cabinet decisions (Photo Credits: PIB)

भारतामध्ये National Recruitment Agency (NRA)ची स्थापना करण्याला आज केंद्रीय मंत्रीमंडळाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता देशात सरकारी नोकरीसाठी, बॅंकांच्या नोकरीसाठी द्याव्या लागणार्‍या वेगवेगळ्या परीक्षा रद्द करून एकच कॉमन एन्टरन्स टेस्ट (Common Entrance Test ) म्हणजे सीईटीची परीक्षा (CET Exams)  होईल अशी माहिती देण्यात आली आहे.

NRA ला मंजुरी मिळाल्याने आता भारतामध्ये सुमारे 2.5 लाख नोकरीच्या शोधात असणार्‍यांना सरकारी आणि खाजगी संस्थांकडून द्याव्या लगणार्‍या विविध परीक्षांचा गोंधळ कमी होणार आहे. आता एकच सीईटी घेतली जाईल. त्याचे मार्क्स 3 वर्षांसाठी व्हॅलिड राहतील. याचा फायदा आता देशातील अनेक बेरोजगार आणि नव्या नोकरीच्या शोधात असणार्‍यांना होणार आहे. New Nationa Education Policy 2020: केंद्र सरकारच्या नव्या शैक्षणिक धोरणाचे सूत्र 5+3+3+4.  

ANI Tweet  

National Recruitment Agency कशी असेल?

  • सरकारी आणि पब्लिक सेक्टरमधील बॅंकेत नॉन गॅझेट पदावरील नोकर भरतीसाठी वेगवेगळ्या परीक्षा नसतील. आता उमेदवारांना एकच सीईटी ऑनलाईन परीक्षा द्यावी लागेल.
  • सीईटीचा निकाल जाहीर झाल्यानंतर 3 वर्षांपर्यंत गुण ग्राह्य धरले जातील.
  • उमेदवारांना त्यांचे गुण सुधारण्यासाठी 2 अतिरिक्त संधी दिल्या जातील. ज्यामध्ये चांगले गुण असतील ते अंतिम केले जातील.
  • NRA च्या सीईटी मेरीट लिस्ट गुणांवरच आता राज्यातील नोकर भरतीसाठी देखील उमेदवार निवडला जाऊ शकतो.

देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी फेब्रुवारी महिन्यातील अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये पहिल्यांदा NRA ची संकल्पना मांडली होती.