रिलायन्स जिओने (Reliance Jio) आपल्या ग्राहकांसाठी दोन नवे स्वस्त प्रीपेड प्लॅन्स लॉन्च केले आहेत. 49 आणि 69 रुपयांचे हे दोन प्लॅन्स आहेत. यात युजर्संना कॉलिंग, मोबाईल डेटा, एसएमएस यांसारख्या सुविधा देण्यात आल्या आहेत. हे दोन्ही प्लॅन्स केवळ जिओ फोन युजर्ससाठी आहेत. तसंच या प्लॅन्सचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे जिओचे सिम असणे गरजेचे आहे.
49 रुपयांच्या प्लॅनची व्हॅलिटीडी 28 दिवसांची असून यात 2GB डेटा देण्यात येणार आहे. तसंच जिओ टू जिओ अनलिमिटेड कॉलिंग, तर दुसऱ्या नेटवर्कला 250 मिनिट्स कॉलिंग देण्यात आले आहेत. तसंच 25 मेसेजेसची सुविधा देखील देण्यात येणार आहे. जिओच्या अॅप्सचा अॅक्सेस कॉम्लिमेंटरी देण्यात येणार आहे. (Reliance Jio चे सर्वात बेस्ट प्रीपेड प्लॅन, दररोज युजर्सला मिळणार 2GB डेटा)
69 रुपयांच्या जिओच्या प्लॅनमध्ये 0.5GB हाय स्पीड डेटा दररोज दिला जाईल. एका ठराविक मर्यादेनंतर डेटाचा स्पीड 64Kbps करण्यात येईल. या फ्रेश प्लॅनमध्ये जिओ टू जिओ अनलिमिटेड कॉलिंग, तर दुसऱ्या नेटवर्कला कॉल करण्यासाठी 250 मिनिट्स कॉलिंग देण्यात आले आहेत.
जिओचा मासिक प्लॅन 75 रुपयांचा आहे. याची व्हॅलिटीडी 28 दिवसांची असून यात एकूण 3GB डेटा, जिओ ते जिओ कॉलिंग अनलिमिटेड आणि जिओ ते अन्य नेटवर्कवर कॉलिंगसाठी 500 मिनिट्स दिले जात आहेत. त्याचबरोबर 50 फ्री मेसेजेस सह सर्व अॅप्सचे सब्सक्रिप्शनही दिले जाते.
दोन वर्षांपूर्वी रिलायन्स जिओने 49 रुपयांचा व्हॅलिटीडी प्लॅन लॉन्च केला होता. मात्र नंतर तो बंद करण्यात आला. आता पुन्हा हा प्लॅन कंपनीने सादर केला असून त्याची व्हॅलिटीडी कमी करण्यात आली आहे. व्हॅलिटीडी जरी कमी केली असली तरी डेटा बेनिफीट्स वाढवण्यात आले आहेत. हा प्लॅन जिओ फोन आणि जिओ फोन 2 युजर्ससाठी सादर करण्यात आला आहे.