आयपीएल 2021 (IPL 2021) चा हंगाम आजपासून सुरु होणार आहे. या सीजनमधील सामन्यांचा आनंद घेण्यासाठी जिओने (Jio) क्रिकेटप्रेमींसाठी खास प्लॅन्स लॉन्च केले आहेत. त्याचप्रमाणे जिओफोन युजर्ससाठी एक नवा गेम आणि नवे अॅप देखील सादर करण्यात आले आहे. आयपीएलचे सामने हॉटस्टारद्वारे (Hotstar) लाईव्ह पाहण्यासाठी जिओने काही नवे प्रीपेड प्लॅन्स (Prepaid Plans) लॉन्च केले आहेत. (Reliance Jio 5G Launch 2021: मुकेश अंबानी यांची घोषणा,पुढच्या वर्षी रिलायन्स जिओ 5G सेवा लॉन्च करणार)
जिओ फोन युजर्संना त्यांच्या मोबाईलवर जिओ क्रिकेट अॅप फ्री मध्ये मिळणार आहे. या अॅपद्वारे क्रिकेट सामन्यांचे लाईव्ह स्कोअर्स, क्विजेस आणि त्यातून त्यांना बक्षीसं जिंकण्याची संधी देखील मिळणार आहे. या सोबतचं जिओ युजर्स वेगवेगळ्या कॉन्टेस्टमध्ये सहभाग घेऊन क्रिकेट बॅट, बॉल, टीम जर्सी यांसारखी बक्षीसं जिंकू शकतात. या सोबतच सर्व आयपीएल टीमच्या प्लेअर्संना भेटण्याची संधी देखील जिओ युजर्संना मिळू शकते.
जिओ युजर्स आयपीएलवर आधारीत विविध प्लॅन्सपैकी आवडीचा प्लॅन निवडून आयपीएल 2021 च्या हंगामाचा आनंद घेऊ शकतील. हे प्रीपेड प्लॅन्स 401 रुपयांपासून ते 2599 रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. या सर्व प्लॅनसोबत डिज्नी+हॉटस्टार व्हिआयपीचा वार्षिक प्लॅन युजर्संना मिळणार आहे.
401 रुपयांचा प्लॅन 28 दिवसांसाठी व्हॅलिड असून यामध्ये युजर्संना अनलिमिडेट कॉल्स, दिवसाला 3 जीबी डेटा आणि 100 फ्री एसएमएस मिळणार आहेत. या खास ऑफरमध्ये युजर्संना एक्स्ट्रा 6 जीबी डेटा देखील मिळणार आहे. 598 रुपयांच्या प्लॅनची व्हॅलिडीटी 56 दिवसांची असून यामध्ये अनलिमिडेट कॉल्स आणि दिवसाला 2 जीबी डेटा मिळणार आहे.
777 रुपयांच्या प्लॅनमध्ये 84 दिवसांची व्हॅलिडीटी मिळणार असून दिवसाला 1.5 जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉल्स मिळणार आहेत. या प्लॅनसोबत युजर्संना एक्स्ट्रा 5 जीबी डेटा देखील मिळेल. 2599 रुपयांचा प्लॅन हा एक वर्षासाठी व्हॅलिड असून यामध्ये अनलिमिडेट कॉल्स सोबत दिवसाला 2 जीबी डेटा युजर्संना मिळेल. या प्लॅनसोबत युजर्संना 10 जीबी एक्स्ट्रा डेटा देखील मिळेल.