Jio Celebration Offer: जिओ ग्राहकांना मिळेल 8GB 4G डेटा अगदी मोफत
जिओ (Photo Credit: PTI)

Jio Celebration Offer: रिलायन्स जिओ (Reliance Jio) लॉन्च झाल्यापासून ग्राहकांसाठी नवेनव्या ऑफर्स सादर करत आहे. सुरुवातीला काही महिने ग्राहकांसाठी फ्री डेटा आणि कॉलिंगची सुविधा जिओने दिली होती. त्यानंतर वेळोवेळी जिओने ग्राहकांना फ्री डेटाची ऑफर दिली आहे. आता रिलायन्स जिओने युजर्ससाठी Jio Celebration Offer सादर केली आहे. या ऑफर अंतर्गत युजर्सला 8 जीबी हाय स्पीड डेटा फ्री देण्यात येणार आहे. दररोज 2 जीबी डेटा याप्रमाणे हा डेटा युजर्सला देण्यात येईल. याची व्हॅलिटीडी 4 दिवसांची असेल.

युजर्सला प्रत्येक दिवशी 2 जीबी डेटा याप्रमाणे 8 जीबी डेटा देण्यात येईल. कंपनीच्या Celebration Offer ची अॅक्टीव्हेट होण्याची तारीख फक्त वेगवेगळी असेल. यासाठी युजर्सला काही खास करण्याची गरज नाही. ही ऑफर ऑटोमेटीक अॅक्टीव्ह होईल. तुम्ही जर जिओ युजर असाल तर MY Jio अॅपच्या प्लॅन सेक्शनमध्ये जावून मिळणारी ऑफर तुम्ही पाहू शकता.

कसा चेक कराल डेटा बॅलन्स?

- सर्वप्रथम My Jio अॅप ओपन करा.

- त्यात Plan ऑप्शनवर क्लिक करा.

- प्लॅनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या सुरु असलेल्या प्लॅनची आणि जिओ सेलिब्रेशनच्या ऑफरची माहिती मिळेल.

- इथे तुम्हाला सेलिब्रेशन प्लॅन डेटा बॅलन्स मध्ये प्लॅनची माहिती मिळेल.

यापूर्वी कंपनीने सप्टेंबर महिन्यात दोन वर्ष पूर्ण झाल्याने जिओ सेलिब्रेशन पॅक लॉन्च केला होता. यात ग्राहकांना 16 जीबी डेटा फ्री दिला जात होता.