वर्षभर मोबाईलचा त्याग करा आणि मिळवा 71 लाख रुपयांचे बक्षिस
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits: PTI)

लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सगळ्यांना सध्या मोबाईलने वेडं करुन सोडले आहे. मात्र जर तुम्ही वर्षभराराठी मोबाईलचा त्याग करण्यास तयाक असलात तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. फक्त वर्षभरासाठी मोबाईलचा वापर करणे बंद करावयाचा असून हे कार्य पूर्ण केल्यावर तुम्हाला चक्क 1000,000 डॉलर म्हणजेच 71 लाख रुपयांचे बक्षिस मिळणार आहे.

कोका- कोला (Coca-Cola)  कंपनीच्या मालकी हक्कामधील विटामिनवॉटर (Vitaminwater) ने ही नागरिकांसाठी वर्षभर मोबाईलचा त्याग करा आणि बक्षिस जिंका ही स्पर्धा आणली आहे. या स्पर्धेसाठी तुम्हाला लाईडिरेक्टर नावाच्या मशिनद्वारे एक चाचणी करण्यात येणार येईल. जेणेकरुन त्यामधुन तुम्ही या स्पर्धेच्या नियम आणि अटींचे उल्लंघन केले आहे की नाही हे समजणार आहे. तर 'स्क्रॉल फ्री फॉर ए ईयर' असे या स्पर्धेचे नाव आहे. तर स्पर्धकाला 1996 काळातील एक टेलिफोनसुद्धा देण्यात येणार आहे.

या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी तुम्हाला 8 जानेवारी 2019 पूर्वी #nophoneforayear किंवा #contest हे दोन हॅशटॅग वापरुन ट्विटर किंवा इन्स्टाग्रामवरुन स्पर्धेसाठी नोंदणी करता येणार आहे. तसेच स्पर्धेत सहभागी होण्यापूर्वी स्पर्धकाला तुम्हाला मोबाईलची सवय का सोडायची आहे याचे कारण नक्की विचारले जाणार आहे. तसेच रिकाम्या वेळेचा तुम्ही कसा उपयोग करणार या प्रश्नाचे ही तुम्हाला कंपनीला उत्तर द्यावे लागणार आहे.