iQOO Z3 5G (Photo Credits: Twitter)

iQOO Z3 5G हा स्मार्टफोन येत्या 8 जूनला भारतात लाँच करण्यात येणार आहे. येत्या 8 जूनला दुपारी 12 वाजता हा स्मार्टफोन लाँच करण्यात येणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा इव्हेंट ऑफलाईन न करता ऑनलाईन लाँच केला जाणार आहे. हा इव्हेंट कंपनीच्या अधिकृत YouTube चॅनलवर पाहता येईल. हा स्मार्टफोन कोणती खास वैशिष्ट्ये असतील याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. दरम्यान iQOO च्या ट्विटरच्या अधिकृत पेजवर याच्या लाँचिंगबाबत माहिती देण्यात आली आहे.

या स्मार्टफोनची विक्री भारतात ई कॉमर्स साइट Amazon वर केली जाईल. लाँचिंग इव्हेंटमध्ये याबाबत माहिती दिली जाईल. iQOO Z3 5G स्मार्टफोनमध्ये 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज वेरियंटची किंमत RMB 1699 (जवळपास 18,800 रुपये), तर 8GB रॅम आणि 256 स्टोरेज वेरियंटची किंमत RMB 1999 (जवळपास 22,200 रुपये) इतकी असू शकते.हेदेखील वाचा- Reliance Jio च्या एका रिचार्ज प्लॅनसोबत दुसरा मोफत! जाणून घ्या Plan Details

iQOO Z3 5G स्मार्टफोनच्या डिस्प्लेविषयी बोलायचे झाले तर, 6.58 इंचाची FHD+LCD डिस्प्ले दिली गेली आहे. याचा रिफ्रेश रेट 120Hz, एस्पेक्ट रेश्यो 20:9 आणि रिजोल्युशन 2408x1080 पिक्सेल आहे. हा फोन वॉटरड्रॉप नॉच आणि HDR10+ सपोर्टसह येतो. या फोनमध्ये LPDDR4x रॅम, 256GB UFS 2.2 स्टोरेज मिळू शकतो. त्याचबरोबर हा स्मार्टफोन Android 11 वर काम करेल आणि 55W फास्ट चार्जिंग सपोर्टची 4400mAh ची बॅटरी असू शकते.

iQOO Z3 5G स्मार्टफोनच्या कॅमे-याविषयी बोलायचे झाले तर, यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळेल. यात 64MP चा प्रायमरी कॅमेरा, 8MP चा अल्ट्रा वाइड अँगल सेंसर आणि 2MP चा डेप्थ सेंसर असू शकतो. या फोनमध्ये सेल्फीसाठी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 16MP चा कॅमेरा असू शकतो. या स्मार्टफोनमध्ये LED फ्लॅश आणि EIS सारखे फिचर्स देण्यात आले आहे. या स्मार्टफोनचा आकार 163.95×75.30×8.50mm आणि 185.5 ग्रॅम वजन आहे.

iQOO Z3 5G स्मार्टफोनच्या कनेक्टिव्हिटी बोलायचे झाले तर, यात 5G SA/NSA, 4G VoLTE, WiFi 802.11 ac (2.4GHz + 5GHz), Bluetooth 5.1, GPS/GLONASS, USB Type-C पोर्ट दिला जाईल. त्याचबरोबर यात साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेंसरसुद्धा असेल.