iphone प्रेमींंसाठी महत्त्वाची बातमी; लवकरच  iOS 8 ला WhatsApp सपोर्ट बंद होणार
WhatsApp (Photo Credits: Flickr)

व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) या लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅपची क्रेझ आज जगभरात आबामवृद्धांमध्ये आहे. मात्र सतत अधिकाधिक युजर्स जोडण्यासाठी अ‍ॅप मध्ये काही बदल केले जातात. त्यानुसार, आता लवकरच अ‍ॅपल फोन मधील ऑपरेटिंग सिस्टम iOS 8 मधून व्हॉट्सअ‍ॅप सपोर्ट बंद होणार आहे. WABetaInfo ने एका ट्वीटच्या माध्यमातून युजर्सना ही माहिती दिली आहे.

व्हॉट्सअ‍ॅपची iOS 8 ही आता जुन्या सिस्टमवर कार्यान्वित होणार आहे. त्यामुळे iPhone वर कॅपेटिब्लिटी 1 फेब्रुवारी 2020 पासून स्थगित होईल. WhatsApp ने शेअर केलेल्या माहितीनुसार, 2.3.7 व्हर्जनच्या अ‍ॅन्ड्रॉईड स्मार्टफोन्स युझर्स आणि iOS 7 वर चालणाऱ्या iPhone यूझर्सला फेब्रवारी 2020 पासून WhatsApp सपोर्ट करणे बंद होणार आहे.

नवीन स्मार्टफोन्स वापणार्‍यांना कंपनीकडून सॉफ्टवेअर अपडेट्स मिळतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात ग्राहकांना फटका बसणार नाही. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, 4.0.3 किंवा त्यापुढील व्हर्जनचे स्मार्टफोन्स वापरा. यासोबतच iOS 8 पुढील व्हर्जन वापरणाऱ्या आयफोन युझर्सला व्हॉट्सअॅपच्या निर्णयाचा फटका बसणार नाही. त्याशिवाय Windows फोनमध्ये WhatsApp 31 डिसेंबर 2019नंतर काम करणार नाही.