फोटोज आणि व्हिडिओज साठी लोकप्रिय ठरलेले इंस्टाग्राम अॅप अलिकडे युजर्ससाठी नवनवे फिचर्स सादर करत आहे. आता इंस्टाग्रामने व्हिडिओ रिवाईंड हे नवे फिचर लॉन्च केले आहे. या फिचरमुळे व्हिडिओ पाहताना आपण तो रिवाइंड करू शकतो. यापूर्वी तुम्ही जर इंस्टावर व्हिडिओ बघत असाल आणि एखादा पार्ट मिस झाल्यास तुम्हाला तो व्हिडिओ पुन्हा प्ले करुन बघावा लागत होता. आता व्हिडिओ रिवाईंड फिचरमुळे ज्या सेकंदापासून तुमचा व्हिडिओ बघणे राहून गेले असेल त्या क्षणापासून तुम्ही व्हिडिओ पुन्हा पाहू शकता. इंस्टाग्राम apk फाईलमध्ये इंस्टाग्राम सीक बार @wongmjane च्या डेवलपरने याबाबत माहिती दिली आहे.
सध्या इंस्टाग्राम सीक बारची चाचणी करत असून लवकरच सीक बारवर क्लिक करुन तुम्ही कोणत्याही सेकंदापासून व्हिडिओ पाहू शकता. तसंच आता या व्हिडिओमुळे संपूर्ण व्हिडिओ पाहण्याची गरज नाही तर इन्स्टा युजर्स फक्त आपल्याला हवा असलेला व्हिडीओचा भाग ड्रॅग करून पाहू शकतात.
यासोबतच इंस्टाग्रामवर लवकरच शॉपिंगची संधी मिळणार आहे. त्यासाठी नव्या फिचर लॉन्च करण्यात येईल. तर युजर्सच्या सुविधेसाठी इंस्टाग्रामने सेन्सिटीव्हि स्क्रीन हे नवे फिचर सादर केले आहे. यामुळे अश्लील फोटो, व्हिडिओ, थंबनेल्स युजर्स क्लिक करेपर्यंत ब्लर दिसणार आहेत.