Instagram Update :  इन्स्टाग्रामचं व्यसन जडण्यापासून तुम्हांला दूर ठेवले 'Your Activity' हे नवं फीचर
Your Activity" feature Photo Credits: Twitter)

आजकाल आबालवृद्धांना सोशल मीडियाचं व्यसन जडलं आहे. इन्स्टाग्राम हे तरुणाई मध्ये लोकप्रिय असलेलं एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. फोटोज, व्हिडीओज शेअर करण्यासाठी इन्स्टा ग्राम प्रामुख्याने वापरलं जातं त्यामुळे दिवसभरातील बराच वेळ यावर विनाकारण वाया जात असतो. आता इन्स्टाग्रामवर तुमच्या वेळेचं नियोजन करण्यासाठी एक खास पर्याय खुला करण्यात आला आहे. इन्स्टाग्रामने Your Activity हे खास फीचर लॉन्च केलं आहे.

Your Activity या फीचरमुळे तुम्ही इंस्टवर किती वेळ राहताय याचं मोजमाप करता येणार आहे. यामध्ये दिवसभरातील किती वेळ इन्स्टा ग्राम पाहायचं यासाठी टाईम लिमिट लावणं शक्य होणार आहे. सुरुवातीला यामध्ये म्यूट नोटिफिकेशनचाही पर्याय देण्यात आला आहे.

  • कुठे पाहाल Your Activity फिचर - 

इन्स्टाग्रामवर तुमच्या प्रोफाइलमध्ये जा.

तेथे hamburger आयकॉनवर क्लिक करा.

त्यानंतर तुम्हांला Your Activity चा पर्याय दिसेल.

तुम्ही इन्स्टा किती वेळ पाहत आहात हे तुम्हांला यावर समजेल. त्यानुसार तुम्ही दिवसाचं लिमिट ठरवू शकता.

लवकरच इन्स्टाग्राम प्रमाणेच फेसबुकवरही हे फिचर दिसणार आहे. "Your time on Facebook" असे या फिचरचं नाव असेल. आजकाल सोशलमीडियाच्या व्यसनापायी मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर त्याचा गंभीर परिणाम होत असल्याचं दिसत आहे. त्यामुळे आता सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वाराचं त्याचा वापर नियंत्रणात ठेवण्यासाठी पुढाकार घेतला जाणार आहे.