Infinix Hot S3X भारतात लॉन्च ; 'या' दमदार फिचर्ससह 9999 रुपयांना उपलब्ध
Infinix Hot S3 (Photo Credit : Twitter)

स्मार्टफोन कंपनी Infinix ने भारतात एक नवा हँडसेट Infinix Hot S3X लॉन्च केला आहे. हे कंपनीच्या Infinix Hot S3 चे अपग्रडेड वेरिएंट आहे. या फोनची किंमत 9,999 रुपये असून हा फोन पुढील महिन्यात सुरु होणाऱ्या फ्लिपकार्ट बिग दिवाळी सेलमध्ये उपलब्ध होईल. हा फोन आईस ब्लू, सेंटस्टोन ब्लॅक आणि ग्रे रंगामध्ये सादर करण्यात येईल.

Infinix Hot S3X चे फिचर्स

या फोनमध्ये तुम्ही ड्युअल सिम वापरु शकता. हा फोन अॅनरॉईड 8.1 ऑरियोवर काम करतो. यात 6.2 इंचाचा एचडी प्लस एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. डिस्प्लेचे रिजोल्यूशन 720x1500 इतके आहे. याचा आस्पेक्ट रेश्यो 18.7:9 हा आहे. ग्राफिक्ससाठी यात एड्रेनो 505 जीपीयू इंटीग्रेटेड आहे. इंटरनल स्टोरेज 128 जीबीपर्यंत वाढवण्यााठी तुम्ही मायक्रो एसडी कार्डचा वापर करु शकता. यात 4000 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.

फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ड्युअल रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. याचे प्रायमरी सेंसर 13 मेगापिक्सल आणि सेकंडरी सेंसर 2 मेगापिक्सल आहे. दोन्हीही सेंसर एफ/2.0 अपर्चरसोबत येतील. त्याचबरोबर यात 16 मेगापिक्सलचा सेल्फी सेंसर देण्यात आला आहे. कनेक्टिव्हीटीसाठी फोनमध्ये वाय फाय, ब्लूटुथ 4.2, जीपीएस, मायक्रो युएसबी पोर्ट, ओटीजी सपोर्ट आणि 3.5 एमएमचा हेडफोन जॅक देण्यात आला आहे.