टेलिकॉम कंपन्या एकमेकांना टक्कर देण्यासाठी दरवेळेस नवे-नवे प्लॅन्स सादर करत असतात. आता वोडाफोन-आयडिया लिमिडेट ने एका नव्या प्लॅनची घोषणा केली आहे. या नव्या प्लॅननुसार, आयडिया (Idea) निरवाना पोस्टपेड प्लॅन्स (Idea’s Nirvana postpaid Plans) सब्सक्रायबर्स 999 रुपयांचा प्लॅन घेतल्यास अॅमेझॉन प्राईमचे सब्सक्रिप्शन मोफत मिळवू शकतात. या प्लॅनच्या अंतर्गत आयडिया निरवाना पोस्टपेड प्लॅन्सचे युजर्स प्राईम व्हिडिओ, प्राईम म्युझिक, प्राईम रिडिंग, फास्ट शिपिंग आणि एक्सक्लुझिव्ह डिल्सवर अर्ली अॅक्सेस यांसारख्या सेवांचा लाभ घेऊ शकतात.
वोडाफोनने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी रेड पोस्टपेड प्लॅन्सवर पूर्वीपासूनच अॅमेझॉन प्राईम सब्सक्रिप्शन वोडाफोन पोस्टपेड ग्राहकांना दिले आहे. या नव्या ऑफर अंतर्गत 399 रुपयांच्या वर आयडिया निरवाना प्लॅनचे रिचार्ज करणाऱ्या ग्राहकांना अॅमेझॉन व्हिडिओ अनलिमिटेड व्हिडिओ सर्व्हिसचा आनंद घेऊ शकता.
येथे ग्राहकांना प्रीमियम मुव्हीज, टिव्ही शोज, हॉलिवूड मूव्हीज, बॉलिवूड आणि रिजनल मुव्हीज, टॉप टीव्ही शोज, स्टॅड अप कॉमेडिज, किड्स प्रोग्रॅम आणि प्राईम ओरिजिनल सीरीजचे व्हिडिओज देखील पाहायला मिळतील. याशिवाय ग्राहकांना अॅमेझॉन प्राईम म्युझिकचा देखील फायदा मिळवता येईल. तसंच युजर्स अॅड फ्री म्युझिक, अनलिमिटेड ऑफलाईन डाऊनलोड्स आणि 20 भाषांमध्ये म्युझिक अॅक्सेस करु शकतात. याशिवाय युजर्सला फ्री ई-बुक्स आणि अनलिमिटेड फ्री 1-2 डे डिलिव्हरी, एक्सक्लुझिव्ह लॉन्च आणि डिस्काऊंट्सचे अर्ली अॅक्सेस देखील मिळेल.
मात्र 399 रुपयांहून अधिकचा रिचार्ज करणाऱ्या ग्राहकांना 40GB डेटा, 100 लोकल आणि नॅशनल SMS, फ्री इनकमिंग-आऊटगोईंग कॉल्सची सुविधा दिली जाईल. याशिवाय युजर्स आयडिया युजर्स अॅमेझॉन प्राईम सर्व्हिसचा लाभ घेण्यासाठी 499, 649, 999, 1299 किंवा 1999 रुपयांचा प्लॅन्स घेऊ शकतात.