WiFi (Representational Image)

फ्री-वायफाय चा वापर करण्यास सर्वचजण पुढे येतात. मात्र असे करणे धोकादायक ठरु शकते. कारण युजर्सला त्यांची ही चुकी महागात पडू शकते. कारण हॅकर्स अशाच लोकांचा फायदा घेत त्यांची फसवणूक करु शकतात. मात्र जर फ्री वायफाय तुम्हाला वापरायचे आहे आणि हॅकर्स पासून सुद्धा बचाव करायचा आहे तर काही सोप्प्या ट्रिक्स कामी येऊ शकतात. याच बद्दल आम्ही तुम्हाला आज सविस्तर मध्ये सांगणार आहोत.(Apple Watch Series 7: अॅपल नवीन Apple Watch Series 7 लाँच करण्याच्या तयारीत, 41mm ते 45mm आकारात असल्याची शक्यता)

मुख्य गोष्ट म्हणजे सार्वजनिक आणि फ्री-वायफायचा वापर करणे शक्यतो टाळा. कारण हॅकर्सचे या गोष्टींकडे सातत्याने लक्ष असून ते तुम्हाला त्यांच्या जाळ्यात अडकवू शकतात. तुमचा खासगी डेटा लीक करण्यासह बँक खात्यातील पैसे सुद्धा चोरीला जाण्याची गरज असते. आणखी एक महत्वाची बाब म्हणजे सार्वजनिक वायफाय किंवा फ्री वायफायच्या कनेक्शनवर बँकेशी निगडित कोणतीही कामे करण्यापासून तुम्ही दूर रहा. बाकी अन्य साधारण गोष्टींसाठी तुम्ही फ्री वायफायचा वापर करु शकता.

-फ्री वायफायचा वापर करण्यासाठी सर्वात प्रथम तुम्ही मोबाईलच्या सेटिंगमध्ये जा.

-आता वायफाय ऑप्शनवर क्लिक करा.

-येथे तुम्हाला स्कॅनिंग ऑलवेज एविलेबलचे ऑप्शन दिसेल. लक्षात असू द्या की, हे फिचर विविध डिवाइसमध्ये वेगवेगळ्या नावाने उपलब्ध असते.

-हे फिचर अॅक्टिव्हेट करा.

-जर तुम्हाला वायफाय संबंधित काही समस्या येत असेत तर या फिचरच्या माध्यमातून स्कॅन करुन तुम्हाला नोटिफिकेशन मिळणार आहे.

-या पद्धतीने तुम्ही हॅकर्सच्या निशाण्यावर सुद्धा येऊ शकत नाही.

स्वत:ला सुरक्षित ठेवण्यासाठी वर्च्यु्अल प्रायव्हेट नेटवर्क म्हणजेच VPN चा वापर करु शकता. जर एखादा हॅकर्स तुमच्या कनेक्शनच्या दरम्यान स्वत:ळा स्थापित करण्याचा प्रयत्न करत असेल तर येथे डेटाच्या दृढतेमुळे एन्क्रिप्ट होणार आहे.